Advertisement

उपनगरीय रेल्वतून सर्वसामान्यही करू शकतात प्रवास

निर्बंधांच्या काळात उपनगरीय रेल्वे सेवेचा सर्वसामान्य नागरिक वापर करू शकतात, पण त्यासाठी वैध कारण द्यावे लागेल, असे राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

उपनगरीय रेल्वतून सर्वसामान्यही करू शकतात प्रवास
SHARES

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या काळात उपनगरीय रेल्वे सेवेचा सर्वसामान्य नागरिक वापर करू शकतात, पण त्यासाठी वैध कारण द्यावे लागेल, असे राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय सकाळी फिरणे, सायकल चालविण्यास बंदी असणार आहे. ई-कॉमर्समध्ये किराणा, औषधे, अन्नपदार्थ इत्यादी अत्यावश्यक सेवेतील वस्तूंच्या वितरणासही परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात कशाचा वापर करता येईल, काय सुरू असेल आणि कोणते व्यवहार बंद असतील याची सविस्तर माहिती राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उपनगरीय रेल्वेसेवा सुरू राहील. खासगी वाहने सबळ कारणांशिवाय रस्त्यावर आणता येणार नाही. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून (रेल्वे, बसेस) प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून कोणालाही कुठेही ये-जा करणे शक्य होईल. अर्थात, बस गाड्यांमधून उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसन क्षमतेएवढ्याच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाईल.

हे बंद राहणार

सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकल चालविणे.

कपड्यांची दुकाने, पुस्तकांची दुकाने, मद्याची दुकाने आणि सिगारेट दुकाने.

साहित्याची ऑर्डर ऑनलाइन किंवा दूरध्वनीवरून देता येईल, मात्र बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.

प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय काम सुरू ठेवता येणार नाही.

‘मूव्हर्स एन्ड पॅकर्स’ सेवा पुरवठादारांच्या मदतीने अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घरातील साहित्य, वस्तू अन्यत्र हलवता येईल. मात्र सर्वसाधारणपणे साहित्य हलविण्यास परवानगी नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा