Advertisement

१२-१४ वयोगटातील मुलांचे 'या' १२ केंद्रांवर लसीकरण

मुंबईतील १२ लसीकरण केंद्रांवर आणि कोविड जम्बो केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येत आहे.

१२-१४ वयोगटातील मुलांचे 'या' १२ केंद्रांवर लसीकरण
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) १२-१४ वयोगटातील लोकांचे कोविड-१९ लसीकरण बुधवारपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले. पुढील दोन दिवस ही लसीकरण मोहीम १२ लसीकरण केंद्रांवर आणि कोविड जम्बो केंद्रांवर होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं १६ मार्चपासून १२ ते १५ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोविड-१९ लस कॉर्बेवॅक्स लागू करण्याची घोषणा केली होती.

पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पालिकेला राज्य सरकारकडून कॉर्बेवॅक्सचे १.२२ लाख डोस मिळाले आहेत.

“आम्ही मुंबईत १२-१५ वयोगटातील सुमारे ३.५ ते ४ लाख किशोरवयीन मुलांचा अंदाज लावला आहे जे राज्य सरकारनं प्रदान केलेल्या डेटाच्या अधीन बदलू शकतात. प्रायोगिक तत्त्वावर, आम्ही मुंबईतील १२ केंद्रांसह कार्यक्रम सुरू करू आणि दोन दिवसांनी वाढवू”, असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

"आमच्याकडे या लोकसंख्येसाठी आवश्यक डोसपैकी एक तृतीयांश डोस आहेत, आणि त्यामुळे कमतरता भासणार नाही," असं काकानी पुढे म्हणाले.

कोरोना लसीकरण केंद्रांची यादी इथं आहे.

१. BYL नायर हॉस्पिटल-मुंबई सेंट्रल

२. ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल

३. LTMG सायन हॉस्पिटल, सायन (पूर्व)

४. केईएम हॉस्पिटल, परळ

५. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स जंबो कोविड लसीकरण केंद्र, वांद्रे (पूर्व)

६. सेव्हनहिल्स हॉस्पिटल, वांद्रे (पूर्व)

७. आरएन कूपर हॉस्पिटल, विलेपार्ले (पश्चिम) डॉ.

८. नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव (पूर्व)

९. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीएमसी हॉस्पिटल, कांदिवली (पश्चिम)

१०. राजावाडी हॉस्पिटल- घाटकोपर (पूर्व)

११. पं. मनमोहन मालवीय हॉस्पिटल- शताब्दी हॉस्पिटल- गोवंडी

१२. स्वातंत्र्यवीर व्ही डी सावरकर बीएमसी हॉस्पिटल, मुलुंड

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, बालरोगतज्ञ आणि आरोग्य तज्ञांनी सांगितलं की १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम येत्या काही दिवसांत महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण मुंबईसह अनेक राज्यात अनलॉक करण्यात आलं आहे. शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

महालक्ष्मी इथल्या एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सोनू उदानी यांनी सांगितले की, त्यांच्या निरीक्षणानुसार, तिसऱ्या लाटेत आजारी मुलांची संख्या जास्त होती.

राज्य बालरोग टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुल पारेख म्हणाले की, लहान मुलांचे लसीकरण न केल्यामुळे, त्यांच्या बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.



हेही वाचा

१२ ते १४ वयोगटातील मुलांना 'ही' लस देणार

आता पालिका सांडपाण्याचीही तपासणी करणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा