Advertisement

coronavirus update: कस्तुरबा रुग्णालयात कोरोना व्हायरस चाचणी केंद्र

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू केलं आहे.

coronavirus update: कस्तुरबा रुग्णालयात कोरोना व्हायरस चाचणी केंद्र
SHARES

कोरोना व्हायरसची (coronaviruses) वाढती संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे. या विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचं आश्वासन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं आहे.

या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) कोरोनाव्हायरस (coronaviruses) चाचणी केंद्र सुरू केलं आहे.  हे केंद्र सुरू करण्यापूर्वी संशयीत लोकांच्या थुंकीचे नमुने (swab samples ) पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (National Institute of Virology - एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले होते. आता गेल्या काही आठवड्यांपासून या चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात केल्या जातात. यामुळे कमी वेळात निदान होऊन तात्काळ उपचार सुरू करण्यात मदत होणार आहे. 

याबाबतची घोषणा करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी म्हणाले की, पूर्वी थुंकीचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलॉजी (एनआयव्ही) इथं पाठविण्यात आले होते. पण आता कस्तुरबा रुग्णालयात चाचण्या घेण्यात येत आहेत. एका वेळी प्रयोगशाळेत ९० नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते आणि ४ किंवा ५ तासांत अहवाल उपलब्ध होतील. बीएमसी प्रशासनाच्या अंदाजानुसार, आतापर्यंत जवळपास ६६ हजार प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ६२ संशयीत रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात अद्याप करोनाचा रुग्ण सापडलेला नाही. 

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन राज्यात शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागांचा आढावा घेतला आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी  विनाकारण घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन अजोय मेहता यांनी केलं. त्याचवेळी नागरिकांनी मास्कऐवजी रुमाल वापरण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सार्वजनिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल, बस, रेल्वे स्थानके, आठवडे बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. 



हेही वाचा -

इतक्या किंमतीला विकल नीरव मोदीचं घड्याळ, वाचाल तर थक्क व्हाल

Coronavirus: मुंबई मेट्रो- वनच्या मार्गिकेसह डब्यांची होणार सफाई

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सीस बॅकेत वळवल्या प्रकरणी फडणवीसांना न्यायालयाची नोटीस




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा