Advertisement

मुंबईत २ शिफ्टमध्ये होणार लसीकरण

१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे.

मुंबईत २ शिफ्टमध्ये होणार लसीकरण
SHARES

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून मोठ्या पातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सध्या देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. तसेच १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मुंबईत २ शिफ्टमध्ये लसीकरण होणार आहे. सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ अशा दोन शिफ्टमध्ये मुंबईत लसीकरण होणार आहे.

३१ मेपर्यंत ३ टप्प्यातील लसीकरण मोहिमेत ४० लाखांचे उद्दीष्ट पार करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेचे आहे. त्यामुळे वेगाने उपाययोजना करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यांच्या मध्यावर पुन्हा मुंबईत कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागल्यामुळे पालिकेचे आव्हान वाढले आहे. याच अनुषंगाने पालिकेने लसीकरण मोहीम वेगाने करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सध्या १०८ केंद्रावर लसीकरण सुरू आहेत.

१६ जानेवारीपासून ते आतापर्यंत ११ लाख जणांचा लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्प्यातील ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असणारे आणि ६० वर्षांवरील जेष्ठांचा समावेश आहे. अजूनही लसीकरण मोहीम सुरू आहे. ३१ मेपर्यंत तिन्ही टप्प्यातील मिळून ४० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

सध्याच्या सकाळी ९ ते सायंकाळी ६ वेळेत लसीकरण होत आहे. यादरम्यान ४० ते ४५ हजार जणांचे लस दिली जात आहे. पण लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दोन शिफ्टमध्ये लसीकरणाचा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास परवानगी दिली आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये २४ तास लसीकरण होणार आहे. पालिकेने परवानगी दिलेल्या १० खासगी रुग्णालयांमध्ये दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. पण दिवसाला १ लाख जणांना लस देण्याचे टार्गेट पालिकेचे आहे.



हेही वाचा -

शीतल-अभिजीतचं लव्ह साँग 'लंडनचा राजा...'

या' दिवशी अॅमेझॉनवर वेल डन बेबीचा खास प्रीमिअर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा