Advertisement

पालिका पुन्हा झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करणार

झोपडपट्ट्यांवर पालिका अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. कारण डिसेंबरमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पालिका पुन्हा झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC)नं कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित केलं होतं. सध्या तिथली परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. पण तरीही झोपडपट्ट्यांवर पालिका अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. कारण डिसेंबरमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

दिवाळीनंतरच्या दुसर्‍या लाटेच्या भीतीनं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं की, शहरातील ४० हजार सक्रिय रुग्णांवर सध्या ते लक्ष केंद्रित करणार आहेत. रेकॉर्ड केलेल्या प्रकरणांमध्ये सध्या घसरण आहे. त्यामुळे प्रशासकिय संस्थेनं हे सुनिश्चित केलं की, कोरोनाव्हायरससाठी स्थापित केलेल्या आरोग्य सुविधा निष्क्रिय होणार नाहीत.

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी १८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, अधि धोका असलेल्या रुग्णांसोबतच झोपडपट्ट्यांवर देखील पुन्हा लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ट्विटरवर आदित्य ठाकरे यांनी लिहिलं की, “आम्ही एका बैठकीत COVID 19 रुग्णांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याच्या अनेक परिस्थितींवर चर्चा केली. उत्सवाचा हंगाम आणि बरेच स्थलांतर सुरू झाल्यावर अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.”

ताज्या अहवालांनुसार, मुंबईच्या धारावीनं COVID 19 च्या संकटाचा प्रभावीपणे सामना करून जगासमोर एक उदाहरण ठेवलं आहे. सुरुवातीला ५० हून अधिक रुग्ण या भागात सापडत होते. पण आता हा आकडा कमी होऊन १-२ वर आला आहे. यासाठी स्थानिक प्रशासकिय अधिकारी आणि खासगी डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेतली.

बोरिवली, कांदिवली, मालाड आणि अंधेरी यासारख्या भागांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. नोव्हेंबरमध्ये कमी झालेल्या चाचणी आकडेवारीत दररोज सुमारे १२ हजार ते १ लाख चाचण्या केल्या जातील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आतापर्यंत सुमारे १७.०७ लाख चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कोरोनाव्हायरसच्या दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ३२० दिवस आहे. सरासरी विकास दर ०.२२ टक्के आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक ३४ हजार सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने सप्टेंबरमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली. जेथे आरोग्य अधिकारी आणि स्वयंसेवक यांनी घरोघरी सर्वेक्षण केले. मोहिमेसाठी सरकारी अधिका-यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था देखील तयार झाल्या आहेत.हेही वाचा

३१ डिसेंबरच्या जल्लोषावर कोरोनाचं सावट, रुग्ण वाढण्याची शक्यता - पालिका

ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण दुपटीचा कालावधी २९७ दिवसांवर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा