Advertisement

ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण दुपटीचा कालावधी २९७ दिवसांवर

पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. रुग्ण आढळण्याचं प्रमाण ८.३८ टक्क्यांवर आलं आहे. याशिवाय मृत्यूदरही २.३ टक्क्यांवर आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण दुपटीचा कालावधी २९७ दिवसांवर
SHARES

मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. पालिका क्षेत्रातील रुग्ण दुपटीचा कालावधी २७२ दिवसांवरून २९७ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या घटण्याबरोबर रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. रुग्ण आढळण्याचं प्रमाण ८.३८ टक्क्यांवर आलं आहे. याशिवाय मृत्यूदरही २.३ टक्क्यांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी आठवडय़ाचा रुग्णवाढीचा वेग ०.३० टक्के इतका होता. तो आता ०.२७ टक्क्यांपर्यंत आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४८ हजार ९१८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४६ हजार ४९४ रुग्ण बरे झाले आहेत. तर ११३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपासून रोज शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. सध्या १२९३ रुग्ण उपचार घेत आहेत. 

ठाणे शहरात दररोज सहा हजारांच्या आसपास चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८.७२ टक्के इतके होते; परंतु आता त्यातही घट झाली असून हे प्रमाण ८.३८ टक्क्यांवर आले आहे. 



हेही वाचा -

मध्य रेल्वे 'या' मार्गावर चालविणार ८ उपनगरी सेवा

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा