Advertisement

कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड वॉर रुम सक्रिय करा; पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड वॉर रुम सक्रिय करा; पालिका आयुक्तांचे आदेश
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका प्रशासनानं कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड रुम सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यासाठी शिक्षकांची मदत घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी वॉर्ड वॉर रुम पुन्हा सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वॉर्ड रुमला कळविल्या शिवाय थेट बेड देता येणार नाहीत. कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता बेड अॅलॉटमेंट सिस्टिम वॉर्ड रुमच्या माध्यमातूनच होणार आहे. सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम या ठिकाणी लक्षण नसलेल्या आणि कोणतेही दीर्घकालीन आजार नसलेल्या कोविड पेशंटला सरसकट बेड देऊ नये, अशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

वॉर्ड वॉर रुममधून रुग्णखाटांची उपलब्धता करून देण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड आणि १०० टक्के आयसीयू बडे महापालिकेच्या ताब्यात आहेत.

मुंबईत सोमवारी दिवसभरात ५ हजार ८८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ५६१ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी ७ पुरुष तर ५ महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णाचा दर ८५ टक्क्यांवर आलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५३ दिवसांवर आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा