Advertisement

बाटलीबंद पाण्यात अाढळले जीवघेणे जीवाणू

बाटलीबंद पाणी आरोग्यास अपायकारक ठरू शकतं, अशी धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) एका कारवाईतून समोर आली आहे.

बाटलीबंद पाण्यात अाढळले जीवघेणे जीवाणू
SHARES

शुद्ध, स्वच्छ पाणी म्हणून मिनरल वाॅटर अर्थात बाटलीबंद पाणी पिण्याकडं अनेक जणांचा कल असतो. त्यातही प्रवासात बाटलीबंद पाण्याचाच पर्याय अनेकजण निवडतात. पण हे बाटलीबंद पाणी खरंच सुरक्षित,शुद्ध आणि स्वच्छ असतं का? त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं का? असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण बाटलीबंद पाणी आरोग्यास अपायकारक ठरू शकतं, अशी धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) एका कारवाईतून समोर आली आहे.


पाण्याचे नमुने अप्रमाणीत

एफडीएच्या अन्न विभागानं सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील बाटलीबंद पाण्याच्या सहा कंपन्यांमधून पाण्याचे नमुने घेत त्यांची तपासणी केली होती. या तपासणीत पाण्याचे दोन नमुने अप्रमाणित तर पाण्याचा एक नमुना असुरक्षित आढळल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई), अन्न, एफडीए यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. असुरक्षित आढळलेल्या पाण्याच्या नमुन्यात स्युडोमोनास अॅरियुजिनोसा बॅक्टेरिया (जीवाणू)  आढळले असून हा बॅक्टेरिया जीवघेणा ठरू शकतो, असं एफडीए आणि डाॅक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळं बाटलीबंद पाणी पिताना विचार करा, काळजी घ्या.


पोटात संसर्ग होण्याची भिती 

अॅरियुजिनोसा बॅक्टेरिया पाण्याच्या माध्यमातून पोटात गेल्यास उलटी, जुलाब, मळमळणं यासारखे आजार होऊ शकतात, अशी माहिती सेंट जाॅर्ज रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. मधुकर गायकवाड यांनी दिली आहे. तर डायरिया आणि काॅलरासारखे आजार यातून झाले तर ते जीवघेणे ठरतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यातही असे बॅक्टेरिया असलेल्या पाण्याचं सेवन सातत्यानं झालं तर पोटात मोठा संसर्ग होण्याची आणि हा संसर्ग जीवघेणा ठरण्याची भिती असल्याचंही डाॅ. गायकवाड यांनी सांगितलं आहे.

कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई

पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर आता एफडीएनं या तिन्ही कंपन्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या या कंपन्यांविरोधात अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं आढाव यांनी सांगितलं आहे. या खटल्यानुसार या कंपन्या दोषी ठरल्यास एक लाख रुपये दंड आणि संबंधीत दोषी व्यक्तीला सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, खटला दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्यानं या कंपन्यांची नाव सांगण्यास एफडीएनं नकार दिला आहे.



हेही वाचा -

५ वर्षांच्या 'ती'लाही बनाचयं 'तो'

औषधं खरेदी करताय? मग सावधान.. हे नक्की वाचा



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा