Advertisement

स्तनाच्या कर्करोगासाठी फ्लुओबीम-आयसीजी फ्लुओरोस्कोपी इमेजिंग यंत्र

ब्रिजस्टोन इंडियाच्या सहकार्याने यंत्रासोबत टाटा रुग्णालयाला ८५ लाखांची मदत करण्यात आली आहे. हे योगदान गरीब घटकातील रुग्णांना स्तनाच्या कर्करोगावरील उपचार करण्यासाठी देण्यात आलं आहे.

स्तनाच्या कर्करोगासाठी फ्लुओबीम-आयसीजी फ्लुओरोस्कोपी इमेजिंग यंत्र
SHARES

ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने 'पिंक वॉल्व कॅप कॅम्पेन’च्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जागतिक स्तरावरील आधुनिक (फ्लुओबीम-आयसीजी फ्लुओरोस्कोपी इमेजिंग यंत्र) मुंबईतील टाटा स्मारक रुग्णालयाला देण्यात आलं आहे.

शिवाय, ब्रिजस्टोन इंडियाच्या सहकार्याने यंत्रासोबत टाटा रुग्णालयाला ८५ लाखांची मदत करण्यात आली आहे. हे योगदान गरीब घटकातील रुग्णांना स्तनाच्या कर्करोगावरील उपचार करण्यासाठी देण्यात आलं आहे.

याविषयी ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांनी सांगितलं की, जे यंत्र आणि निधी देण्यात आला आहे, त्यातून भारत तसंच इतर देशांमधून दरवर्षी टाटा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तब्बल ६४ हजारहून अधिक रुग्णांना फायदा होणं अपेक्षित आहे. या रुग्णालयात येणारे साधारण ६० टक्के कर्करोग रुग्ण हे गरजू असतात आणि त्यांना इथं विनामूल्य सेवा दिली जाते. त्यात आम्ही आमचं थोडं योगदान दिलं आहे.


ब्रिजस्टोनसारख्या एका आघाडीच्या कंपनीने कर्करोगाच्या विरोधातील या मोहिमेला सहकार्याचा हात दिला हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. अशा प्रयत्नांमुळे समाजाच्या वंचित घटकांतील रुग्णांना या रोगाशी लढा देण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर या मोहिमेबाबत जागृतीही निर्माण होईल. स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांना पाठबळ दिल्याबद्दल ब्रिजस्टोनचे आम्ही आभार मानतो.
- डॉ. राजेंद्र बडवे, प्रमुख, टाटा मेमोरिअल रुग्णालय



हेही वाचा-

शासकीय रुग्णालयात आता कर्करोग पूर्वतपासणी केंद्र

जागतिक आरोग्य दिवस: नाहीतर, छोटे आजार होतील मोठे!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा