लठ्ठपणा जागृती अभियानाचा शुभारंभ

 Mumbai
लठ्ठपणा जागृती अभियानाचा शुभारंभ
लठ्ठपणा जागृती अभियानाचा शुभारंभ
लठ्ठपणा जागृती अभियानाचा शुभारंभ
See all

भायखळा - 'लठ्ठपणा जागृती राज्यस्तरीय अभियाना'चा शुभारंभ वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते जे जे रुग्णालयात मंगळवारी होणाराय. लठ्ठपणामुळे उद्भवणा-या आरोग्याच्या समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग आणि जेटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे अभियान राबवलं जातंय.

बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये स्थुलपणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवताना दिसतायेत. सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार 87.3 लाख लोक लठ्ठपणानं ग्रासलेत. यापैकी 12 लाख लोक लठ्ठपणामुळे होणाऱ्या विविध आजारांनी त्रस्त आहेत. यामध्ये हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं निदर्शनास आलंय.

Loading Comments