Advertisement

जे.जे. रुग्णालयात कॅन्सर ओपीडी सुरू


जे.जे. रुग्णालयात कॅन्सर ओपीडी सुरू
SHARES

जे. जे. रुग्णालयात गुरूवारपासून कॅन्सर (बाह्य रुग्ण कॅन्सर विभाग) ओपीडी सुरू करण्यात आली. कॅन्सरचं निदान योग्य वेळी झालं, तर त्यावर उपचार करणं सोपं होतं. योग्य उपचारांतून हा आजार लवकर बरा केला जाऊ शकतो. पण, अनेकदा गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार घेणं शक्य होत नाही. त्यामुळे जे. जे. रुग्णालयात कॅन्सर ओपीडीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या ओपीडीचं उद्घाटन करण्यात आलं. दर मंगळवारी आणि बुधवारी ही कॅन्सर ओपीडी सुरू असणार आहे.

स्तनाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर अशा रुग्णांच्या संख्येत मुंबईसह महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ६० टक्के रुग्णांचा उशीरा उपचारासाठी आल्याने मृत्यू होतो.



लवकर निदानासाठी

कॅन्सरबाबत रुग्णांमध्ये जागरूकता नसल्याने कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात रुग्ण रुग्णालयात येतात. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पण, लवकर निदान झालं, तर कॅन्सर बरा होऊ शकतो हाच या ओपीडी सुरू करण्यामागचा उद्देश असल्याचं जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. कॅन्सर चाचणीसोबतच कर्करोगाचं निदान झाल्यानंतर रुग्णांना आणि नातेवाईकांना उपचारासाठी काय करावं? कुठे जावं? याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


महिलांना फायदा

जे. जे. रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या महिलांना पॅप-स्मिअर चाचणी आणि मॅमोग्राफीसाठी कामा रुग्णालयात पाठवलं जातं. पण किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी कुठून करुन घ्यावी, याबाबतही रुग्णांना कर्करोगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी वैद्यकीय रुग्णालयात कॅन्सर ओपीडी सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण भारताला कॅन्सर मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.
- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा