केमिस्टचा संप मागे

 Pali Hill
केमिस्टचा संप मागे

मुंबई - ऑनलाइन औषधविक्रीविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशननं 19 नोव्हेंबर रोजी पुकारलेला देशव्यापी संप अखेर पुढे ढकलला आहे. देशातील नोटबाणीच्या पार्श्वभूमीवर असोसिएशननं हा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे पदाधिकारी अनिल नावंदर यांनी मुंबई लाईव्हला दिली. 19 नोव्हेंबरला मुंबईतील 50 हजार केमिस्टसह देशातील आठ लाख केमिस्ट संपावर जाणार होते. रविवारी त्रिवेंद्रम येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading Comments