Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

१८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण घराजवळच

मुंबईत आतापर्यंत २३ लाख लोकांना कोरोनाची लस टोचली आहे. रोज एक लाख जणांना लस टोचण्याचं उद्दिष्ट असल्याचं चहल यांनी सांगितलं.

१८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण घराजवळच
SHARES

राज्यात १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण लवकरच सुरू होणार आहे. मुंबईतील नागरिकांसाठी घराजवळच लसीकरण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईतील २२७ प्रभागात प्रत्येकी एक केंद्र अशा एकूण २२७ लसीकरण केंद्रात मोफत लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसंच सध्या ७३ खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरु असून ही वाढवून १०० करण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं

मुंबईत आतापर्यंत २३ लाख लोकांना कोरोनाची लस टोचली आहे. रोज एक लाख जणांना लस टोचण्याचं उद्दिष्ट असल्याचं चहल यांनी सांगितलं. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. १ लाख २५ हजार आरोग्य कर्मचारी, १ लाखांहून अधिक फ्रंटलाईन वर्कर्स, तर ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेले व ६० वर्षांवरील व्यक्तींना लस टोचण्यात येत आहे.

 केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लस टोचली जाणार आहे. यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. २२७ प्रभागात २२७ लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असून १८ वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस टोचली जाणार आहे. 

मुंबईतील ९० लाखाच्या आसपास नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण केंद्रांची गरज लक्षात घेऊन नव्या खासगी लसीकरण केंद्रांना परवानगी देऊन ही संख्या ७३ वरुन १०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.हेही वाचा -

कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार - किशोरी पेडणेकर

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा