डेंग्यूने घेतला पोलीस शिपायाचा बळी

 Govandi
डेंग्यूने घेतला पोलीस शिपायाचा बळी

गोवंडी - गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाचा डेंग्यूने गुरुवारी नवी मुंबईत निधन झाले. प्रकाश पाटील असं त्यांचं नाव असून ते गेल्या दोन महिन्यांपासून गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आठ दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या निधनाने गोवंडी पोलीस ठाण्यात शोककळा पसरली आहे.

Loading Comments