Advertisement

एसटीच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना मिळणार वैद्यकिय उपचाराचा खर्च


एसटीच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना मिळणार वैद्यकिय उपचाराचा खर्च
SHARES

एसटी महामंडळातील कोरोनाची लागण झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता वैद्यकिय उपचाराचा खर्च मिळणार आहे. २ सप्टेंबर २०२० पासून वैद्यकिय उपचारासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध आजारांच्या उपचारांसाठी होणाऱ्या वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते. अशा ‍विविध २७ आकस्मिक आजारांमध्ये कोविड-१९ या आजाराचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.

राज्य शासनानं ‍दिलेल्या मान्यतेनुसार, वैद्यकिय प्रतिपूर्तीसाठी वेळोवेळी केलेले बदल हे राज्य ‍परिवहन महामंडळासाठीही लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय कोरोनाचा संसर्ग होऊन आजारी पडल्यास त्यासाठी होणाऱ्या वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्तीमहामंडळाकडून देण्यात येणार आहे.

हा निर्णय २ सप्टेंबर २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू राहील. या संदर्भातील परिपत्रक कर्मचारी वर्गाचं महाव्यवस्थापक माधव काळेयांनी जारी केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा