Advertisement

राज्यात कोरोना मृतांचा आकडा १० हजार पार!

राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल ८१३९ रुग्ण वाढले. तर आणखी २२३ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे राज्यातील काेरोना मृतांचा आकडा १० हजार पार गेला आहे.

राज्यात कोरोना मृतांचा आकडा १० हजार पार!
SHARES

महाराष्ट्रातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासकीय, प्रशासकीय पातळीवरून सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येऊनसुद्धा कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोना मृतांचा आकडा दरदिवशी वाढतानाच दिसत आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल ८१३९ रुग्ण वाढले. तर आणखी २२३ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे राज्यातील काेरोना मृतांचा आकडा १० हजार पार (corona death cross 10 thousand mark in maharashtra) गेला आहे.

राज्यात शनिवारी ८१३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २ लाख ४६ हजार ६०० इतका झाला आहे. तर, दुसरीकडे शनिवारी झालेल्या मृतांचा २२३ हा आकडा धरून आतापर्यंत राज्यात १० हजार ११६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे सर्वच आकडे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून राज्याची चिंता वाढवणारे आहेत.

त्याशिवाय राज्यात शनिवारी ४३६० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण १ लाख ३६ हजार ९८५ रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचं निदान झाल्यानंतर राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन या दोघांनाही शनिवारी कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. अमिताभ यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनातील १८ कर्मचारी देखील कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तर अजून ५० हून अधिक कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल यायचे आहेत. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा