Advertisement

एपीएमसी मार्केटमधील 2 व्यापाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण एपीएमसी संबंधित असल्याने सध्या बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत.

एपीएमसी मार्केटमधील 2 व्यापाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
SHARES

कोरोनाची लागण झालेल्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोघे कांदा-बटाटा व्यापारी होते. त्यामुळे एपीएमसीमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.  दोघांवरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री दोघांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत मार्केटमध्ये 117 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 55 रुग्ण एपीएमसीमध्ये काम करणारे आहेत. त्यात व्यापारी, कर्मचारी आणि मजुरांचा समावेश आहे. तर 62 जण एपीएमसी मार्केटशी संबंधित आहेत. एपीएमसी मार्केटमधील व्यापाराची पद्धत बदलली नाही तर या 17 तारखेपर्यंतच्या लॉकडाऊन नंतरही एपीएमसी बाजारपेठ सुरू करू नये, अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण एपीएमसी संबंधित असल्याने सध्या बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. या पाचही बाजारपेठा येत्या 18 तारखेपासून पुन्हा सुरू करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. मात्र, व्यापाराच्या पद्धतीमध्ये सुधारणा होत नसेल तर पुन्हा कोरोनाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच व्यापार करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा होत असेल तरच एपीएमसी सुरू करा अन्यथा बंद ठेवा, अशी मागणी गणेश नाईक यांनी केली आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 19 हजार 579 आहे. तर 621 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या वेगानं कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 27 हजारहून अधिक आहे.


हेही वाचा -

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता

पोलिसांवर हल्ल्याच्या 218 गुन्हे, तर 770 जणांना अटक




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा