Advertisement

Coronavirus in thane: ठाण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १ हजार पार

ठाण्यात तर आता कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने १ हजारचा आकडा देखील पार केला आहे.

Coronavirus in thane: ठाण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १ हजार पार
SHARES

मुंबईला खेटून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ठाण्यात तर आता कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने १ हजारचा (corona patient death toll cross 1000 mark in thane district) आकडा देखील पार केला आहे. 

ठाणे जिल्ह्यात १ जुलै २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३९,३१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी २१,६३१ कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून १५,६२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्याशिवाय १०१९ कोरोनाबाधित रुग्णांचा बळी देखील गेला आहे. 

ठाण्यातील ही परिस्थिती पाहता ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १२ जुलै सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. विशेषकरून शहरातील कटेन्मेंट झोनमध्ये लाॅकडाऊनची अंमलबाजवणी अधिक कडकपणे करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलिस आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - ठाण्यातही ३० मिनिटांत होणार कोरोना चाचणी

या लाॅकडाऊन दरम्यान निर्बंध पुढीलप्रमाणे: 

  • अत्यावश्यक सेवेतीली कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा. सरकारी कार्यालयात वावरताना कर्मचाऱ्यांमध्ये कमीत कमी ३ फूट अंतर राखणं आवश्यक,  योग्य स्वच्छता आणि हात सॅनेटायझर्सने स्वच्छ करणं आवश्यक 
  • जीवनावश्यक आणि नाशवंत वस्तूच्या ने-आण कारणाशिवाय इतर सर्व कारणांसाठी मनाई
  • आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी.
  • सगळ्या आंतरराज्यीय बस, प्रवासी वाहतूक, खासगी वाहने, खासगी ऑपरेटर्सचं कामकाज बंद असेल, बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल
  • सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही
  • व्यावसायिक अस्थापना कार्यालये, कारखाने, कार्यशाळा गोदाम इत्यादींसह सर्व दुकाने त्यांचं कामकाज बंद ठेवतील. वैद्यकीय उत्पादने, डाळ, तांदूळ, गिरणी, खाद्य व संबंधि उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांच्या युनिट्सना संमती
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा