Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

ठाण्यातही ३० मिनिटांत होणार कोरोना चाचणी

वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते.

ठाण्यातही ३० मिनिटांत होणार कोरोना चाचणी
SHARES
ठाणे महापालिका प्रशासनाने १ लाख ‘कोविड १९ रॅपिड अ‍ॅण्टिजन किट’ खरेदी केले आहेत. त्यामुळे ठाण्यातही कोरोनाची चाचणी अवघ्या तीस मिनिटांत होणार आहे.  दोन दिवसांमध्ये हे किट महापालिकेला मिळणार आहेत. यामुळे शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार आहे.ठाणे महापालिका हद्दीत मंगळवारी २६६ नवीन रुग्ण आढळले. आता शहरातील एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ७७२ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. गेल्या २४ तासांत १५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ३०७ वर पोहोचला आहे. रोज रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने शहरात पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागू केला आहे. 

 

वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. तसंच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे १ लाख ‘कोविड १९ रॅपिड अ‍ॅण्टिजन किट’ खरेदी केले आहेत.

या किटमुळे कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या आणि करोना संशयित असणाऱ्या व्यक्तींची केवळ ३० मिनिटांत चाचणी करून अहवाल प्राप्त होणार आहे. या किटच्या माध्यमातून स्वॅब घेण्यासाठी नागरिकांना प्रयोगशाळेची गरज भासणार नाही. कोरोना हॉटस्पाॅट, महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण सुरू असलेली ठिकाणे आणि प्रतिबंधित क्षेत्रात सहज करोना चाचणी करणे शक्य होणार आहे. हेही वाचा -

Mumbai Local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

Marathi Compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा