Advertisement

राज्यातील ५ जिल्ह्यांत नवे कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण ६५ टक्क्यांवर

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या प्रमुख ५ जिल्ह्यांत कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण ६५ टक्के आहे.

राज्यातील ५ जिल्ह्यांत नवे कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण ६५ टक्क्यांवर
SHARES

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या प्रमुख ५ जिल्ह्यांत कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण ६५ टक्के आहे. त्यामुळं तेथील चिंता आणखी वाढली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट झाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी ४५५ दिवस होता, तर २१ फेब्रुवारी रोजी ३७१ दिवसांवर आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील तुलना करता मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग दिसून येत होता. सध्या मुंबईत २२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३ लाख १९ हजार ८८८ कोरोनाबाधित असून बळींचा आकडा ११ हजार ४४६ आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ७ हजार ३९७ आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्यानं महापालिकेनं सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका आठवड्याच्या कालावधीत ही केंद्रे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले. कोरोना काळजी केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. विदर्भात मागील ५ दिवसांत दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. या ठिकाणी मृत्युदर २.४१ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१.९ टक्के इतकं आहे.

सध्या देशभरात १० हजार रुग्णालयांचा वापर करण्यात येत आहे. त्यात २ हजार रुग्णालये खासगी आहेत. लसीकरणामध्ये खासगी क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे लवकरच आणखी खासगी रुग्णालयांचा वापर लसीकरणासाठी करण्यात येईल, अशी माहिती भूषण यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा