Advertisement

'ह्या' 4 हॉटेलांमध्ये कोरोना उपचाराची सुविधा

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये काही प्रवाशांना जायचे नाही. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी विमानतळाजवळच 4 खासगी हॉटेलमध्ये वेगळे राहण्याची सुविधा मुंबई महापालिकेनी उपलब्ध केली आहे.

'ह्या' 4 हॉटेलांमध्ये कोरोना उपचाराची सुविधा
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणूून युद्धपातळीवर राज्य सरकार आणि मुंबई महापालिका उपाययोजना करत आहे. करोनाची लागण न झालेल्या आणि फक्त लक्षणे आढळलेल्यांना देखरेखीखाली ठेवण्यासाठी मुंबई विमानतळ परिसरातील 4 मोठ्या हॉटेलांमध्ये पालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या हॉटेलांमध्ये इच्छुक रुग्णांना शुल्क भरून सुविधा घेता येणार आहेत. या रुग्णांवर पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम देखरेख ठेवणार आहे.


 पालिकेच्या रुग्णालयांमध्ये काही प्रवाशांना जायचे नाही. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी विमानतळाजवळच 4 खासगी हॉटेलमध्ये वेगळे राहण्याची सुविधा मुंबई महापालिकेनी उपलब्ध केली आहे. मात्र प्रवाशांना याचा खर्च द्यावा लागेल. सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टर दररोज त्यांची तपासणी करणार आहेत.


हॉटेल                              खाटा

हॉटेल निरंतरा                  ३९

जेडब्ल्यू मॅरिएट जुह          ८०

हॉटेल मिराज                  ४०

हॉटेल रेनिसान्स              १००



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा