Advertisement

देशात 'इतक्या' जणांना लसीचे साइड इफेक्ट


देशात 'इतक्या' जणांना लसीचे साइड इफेक्ट
SHARES

कोरोना या जीवघेण्या व्हायरसला नष्ट करण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीकरण केलं जातं आहे. या व्हायरसनं २०२० जगातील अनेक देशांमध्ये हातपाय पसरले होते. परिणामी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. परंतु, यावर्षी या कोरोनाला आळा घालणारी लस येईल अशी आशा प्रत्येकाला होती. त्यानुसार, यावर्षात लस उपलब्ध ही झाली. मात्र, ही लस दिल्यानंतर अनेकांमध्ये साइड इफेक्ट दिसल्याची माहिती समोर आली. त्यामुळं लस घ्यायची का नाही, असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला आहे.

यंदा १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण करण्यात आलं. या मोहिमेत २ दिवसांत २ लाख २४ हजार ३०१ कोरोनायोद्धय़ांना लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी ४४७ जणांवर प्रतिकूल परिणाम म्हणजेच लसीचा साइड इफेक्ट झाल्याचं समोर आलं आहे. लसीचा प्रतिकूल परिणाम झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने रविवारी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नगरमधील ८ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही कोरोना लसीचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २ लाख ७ हजार २२९ करोनायोद्धय़ांचे लसीकरण करण्यात आले, तर रविवारी सुटीचा दिवस असल्याने केवळ ६ राज्यांमध्ये लसीकरण करण्यात आले. या लसीकरणामध्ये एकूण ५५३ सत्रांमध्ये १७ हजार ७२ जणांना लस टोचण्यात आल्याची माहिती मिळते. रविवारी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर आणि तमिळनाडूमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लस घेतलेल्या एकूण दोन लाख २४ हजार ३०१ पैकी  ४४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु इतर ४४४ जणांना ताप, डोकेदुखी आणि मळमळ अशी किरकोळ लक्षणे आढळल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची रविवारी बैठक घेण्यात आली. त्यात लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्याबरोबरच मोहिमेतील अडथळे आणि नियोजनातील त्रुटी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

कोलकात्यामधील पस्तीस वर्षे वयाची परिचारिका लस घेतल्यानंतर आजारी पडली असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळामार्फत या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. या परिचारिकेला लस दिल्यानंतर भोवळ आली. आरोग्य खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून सदर परिचारिकेची प्रकृती स्थिर आहे.

राज्यातील लसीकरण

भारतात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या २ लशींच्या माध्यमातून लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ३३५२ लसीकरण सत्रे झाली, त्यात १९११८१ जणांना लस देण्यात आली. कोणत्या राज्यात किती जणांना पहिल्या दिवशी लस देण्यात आली.

 • उत्तर प्रदेशात - २१,२९१
 • आंध्र प्रदेश - १८,४१२
 • महाराष्ट्र - १८,३२८
 • बिहार - १८,१६९
 • ओडिशा - १३,७४६
 • कर्नाटक - १३,५९४
 • गुजरात - १०,७८७
 • राजस्थान - ९,२७९
 • पश्चिम बंगाल - ९,७३०
 • मध्य प्रदेश - ९,२१९
 • केरळ - ८,०६२
 • छत्तीसगड - ५,५९२
 • हरयाणा - ५,५८९
 • दिल्ली - ४,३१९
 • तेलंगण - ३,६५३
 • आसाम - ३,५२८
 • झारखंड - ३,०९६
 • उत्तराखंड - २,२७६
 • जम्मू व काश्मीर - २,०४४
 • हिमाचल प्रदेश - १,५१७
 • पंजाब - १,३१९
 • मणिपूरमध्ये - ५८५
 • नागालँड - ५६१
 • मेघालय - ५०९
 • गोवा - ४२६
 • त्रिपुरा - ३५५
 • मिझोराम - ३१४
 • पुडुचेरी - २७४
 • चंडीगड - २६५
 • अंदमान व निकोबार - २२५
 • सिक्कीम - १२०
 • दादरा नगर हवेली - ८०
 • लडाख - ७९
 • दमण व दीव - ४३
 • लक्षद्वीप - २१
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा