Advertisement

WHO नं दिला इशारा, लॉकडाऊन उठवल्यास...

आता WHO च्या चेतावणीमुळे सर्वांच्याच चिंतेत आणखी भर पडली आहे.

WHO नं दिला इशारा, लॉकडाऊन उठवल्यास...
SHARES

कोरोनामुळे जगभरात संक्रमणाची १ लाख १६ हजार ३००  हून अधिक नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यानंतर संक्रमणाची एकूण संख्या ६ दशलक्षांच्या जवळपास गेली आहे. गेल्या २५ तासांत ५ हजार हून अधिक लोक संक्रमणामुळे मरण पावले. आतापर्यंत एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ६१ हजार ५०० पर्यंत वाढला आहे.

आता WHO च्या चेतावणीमुळे सर्वांच्याच चिंतेत आणखी भर पडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष अधिकारी डॉ. डेव्हिड नाबरो यांनी 'कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या धक्क्यासाठी आपण तयार असलं पाहिजे' असं म्हटलं आहे. ते म्हणाले आहेत की, "लॉकडाउन जसजसा कमी होईल तसतसा कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका वाढेल आणि त्यासाठी योग्य तयारी केली पाहिजे." लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जर्मनीत संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं होतं.

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ माईक रेयान यांनी आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागेल असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणाह नाही. जगानं यासोबतच जगायला शिकलं पाहिजे. एचआयव्ही देखील अद्याप संपला नाही. परंतु आपण त्याच्याबरोबर जगत आहोत.

रेयान म्हणाले की, "मी या दोन आजारांची तुलना करीत नाही. परंतु आपणास वास्तव समजलं पाहिजे. कोरोना कधीपर्यंत संपुष्टात येईल याचा कोणताही अंदाज लावता येत नाहीय"

डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रम प्रमुखांचं म्हणणं आहे की, लस आल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग कमी होईल याबाबत काही सांगता येऊ शकत नाही. गोवरसारख्या रोगांसाठी लस आहे. परंतु रोग संपलेला नाही. कोरोनाच्या १०० हून अधिक लसींवर काम सुरू आहे. परंतु ही लस फार प्रभावी असणं गरजेचं आहे. याशिवाय ही लस सर्वांसाठी सहज उपलब्ध असावी.हेही वाचा

माकडांनी पळवले COVID-19 च्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने, परिसरात घबराहट

Exclusive राज्यातील 7 हजार पोलिस 'क्वारनटाइन', तर 24 तासात दोघांचा मृत्यू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा