Advertisement

माकडांनी पळवले कोरोना रुग्णाचे नमुने, परिसरात घबराट

COVID-19 च्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने रुग्णांनी कॉलेजच्या लॅब मधून पळवले.

माकडांनी पळवले कोरोना रुग्णाचे नमुने, परिसरात घबराट
SHARES

देशात कोरोना रुग्णांचा आकडा लाखोच्या घरात गेला आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहे. सरकार ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. पण या प्रयत्नात अनेक अडचणी येत आहेत. पण आज जो प्रकार घडला तो कहरच म्हणावा लागेल. मीरत मेडिकल कॉलेजच्या (Meerut Medical college ) कोरोना टेस्ट लॅबमधला हा प्रसंग आहे.

माकडांची (Monkeys) एक टोळी मेडिकल कॉलेजच्या या परिसरात नेहमीच दिसते. इतके दिवस त्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नव्हतं. पण त्यातल्या माकडांनी आज सकाळी कहर केला. COVID-19 च्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने (covid-19 samples) चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातली तीन सँपल्सच माकडांनी पळवली.

उत्तर प्रदेशात मेरठमध्ये हा प्रकार घडला. या माकडांच्या हातात अजूनही कोव्हिड संशयित रुग्णांची सँपल्स असल्यामुळे आता ती माकडं जिथे जिथे नाचतील, तिथे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण पसरंल आहे. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माकडांनी यापूर्वीही इथं हैदोस घातला असल्याचं मेरठ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. याप्रकरणी कुणाच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे माकडांच्या हाती ही सँपल्स लागली का याचा तपास हॉस्पिटलचे डीन आणि अधीक्षक करत आहेत.



हेही वाचा

१० वर्षांखालील ७०० मुलं कोरोना पॉझिटिव्ह, पण बरे होण्याचा वेग अधिक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा