Advertisement

१० वर्षांखालील ७०० मुलं कोरोना पॉझिटिव्ह, पण बरे होण्याचे प्रमाणही अधिक

कोरोना रुग्णांमध्ये १० वर्षाखालील ७०० मुलांचा देखील समावेश आहे.

१० वर्षांखालील ७०० मुलं कोरोना पॉझिटिव्ह, पण बरे होण्याचे प्रमाणही अधिक
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात १० वर्षाखालील लहान मुंलांचा आकडा ७०० च्या घरात आहे. चांगली बातमी अशी आहे की बहुतेक मुलं बरी झाली आणि मृत्यूचे प्रमाण देखील नगण्य आहे. असं असलं तरी डॉक्टर खबरदारी घेतात. कारण प्रत्येकाची लक्षण वेगवेगळी दिसून येतात. प्रौधांमध्येच असणाकरी लक्षणं लहान मुलांचात पण दिसतील असं काही गरजेचं नाही.

मुंबईत ० (शून्य) ते १० (दहा) या वयोगटातील फक्त २ टक्के मुलांना कोरोनाचं संक्रमण झाला आहे. या २ टक्क्यात फक्त एकाचा मत्यू झाला आहे. तर ११ ते २० या वयोगटातील १२०० मुलांना कोरोना झाला आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

डॉक्टर्स म्हणाले की, बहुतांश मुलांमध्ये कोरोनाची लक्षण नाहीत. तर काहींमध्येकोरोनाची लक्षणं जसं की, ताप, श्वास घेण्याची लक्षणं आढळत आहेत. तर काहींना पोटात दुखणं आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो.       

“मुलं प्रौढांपेक्षा लवकर बरे होत आहेत. अगदी नवजात जन्मलेले बाळ आणि कमी वजनाचे बाळ देखील पूर्णपणे बरे होत आहेत," असं बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरभी राठी म्हणाल्या. नायर रुग्णालयात सध्या कोरोना पॉझिटिव्ह गरोदर स्त्रीयांसाठी एक वॉर्ड बनवण्यात आला आहे. या रुग्णालयात जन्मलेल्या १६१ बाळांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. तर रुग्णालयातील ६० प्रौध मुलांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला.

“आम्ही त्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा टोसिलिझुमब सारख्या महागड्या अँटीबायोटिक देत नाही आहेत,” असं राठी यांनी स्पष्ट केलं.

हिंदमाता रुग्णालयात उपचार करणारे बालरोग तज्ञ डॉ. बिजल श्रीवास्तव म्हणाले की, मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा पालकांकडून किंवा कुटुंबियांकडून होतो. माझ्याकडे आलेल्या ८ मुलांना ताप, लुज मोशन आणि सर्दी होती.

हिंदमाता रुग्णालयात फक्त एक वेगळी केस आढळली त्यात नवजात बालकाच्या जन्मानंतर तीन तासानं त्याला ताप आला.

बालकाला आम्ही वेंटिलेटर वर ठेवलं होतं. हळूहळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होता होती. १८ दिवसांनी बाळ पूर्णपणे बरं होऊन घरी देखीलं गेलं. यासोबतच तिच्या आईची देखील चाचणी नेगेटिव्ह आली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

बालरोग तज्ञ डॉ. नितिन शहा यांनी सर्वात लहान बालकावर उपचार केल्याची नोंद आहे. सुरुवातीला या बालकाला ताप होता.

आम्ही बालकाच्या आईची चाचणी केली तेव्हा ती निगेटिव्ह आली. पण बाळाची चाणी पॉझिटिवह आली. आम्ही दिलेल्या साधारण गोळ्यांनी बाळ बरं झालं, असं नितिन शहा यांनी सांगितलं.

लहान मुलांचं बरं होण्याचं प्रमाण चांगलं आहे. यात काही चमत्कार नाही. तर लहान मुलांची प्रतिकारक शक्ती चांगली असते. ते जलद गतीनं बरे होऊ शकतात, असं वाडिया रुग्णालयाचे डॉ. मुकेश देसाई यांनी सांगितलं.



हेही वाचा

चिंताजनक! मुंबईत आयसीयू बेड ९९ टक्के फुल्ल

पालिकेच्या 300 निवासी डॉक्टरांना 54 हजार विद्यावेतन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा