Advertisement

चिंताजनक! मुंबईत आयसीयू बेड ९९ टक्के फुल्ल

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतच आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबत आता चिंताही वाढत आहे. याचं कारण म्हणजे कोरोना स्पेशल रुग्णालयांमधील बेडची क्षमता आता संपत आली आहे.

चिंताजनक! मुंबईत आयसीयू बेड ९९ टक्के फुल्ल
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतच आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबत आता चिंताही वाढत आहे. याचं कारण म्हणजे कोरोना स्पेशल रुग्णालयांमधील बेडची क्षमता आता संपत आली आहे. आतापर्यंत शहरातील अतिदक्षता विभागातील बेड (ICU Beds) 99 टक्के भरलेले आहेत. तर 72 टक्के व्हेंटिलेटर वापरले जात आहेत. याशिवाय कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करत असलेली रुग्णालये 96 टक्के भरली आहेत.

मुंबई महापालिकेने बेड्सची ही आकडेवारी जाहीर केली आहे.  कोविड रुग्णालयांमधील (तीव्र लक्षण असलेली रुग्ण) ६०९९ बेड्सपैकी ९६ टक्के बेड्स फुल्ल आहेत. तर मध्यम स्वरुपाची लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी असलेल्या कोविड आरोग्य केंद्रावरील १४३७ बेड्सपैकी ८० टक्के बेड भरले आहेत. विशेष म्हणजे ६४५ कोविड आयसीयू बेड्सपैकी ९९ टक्के बेड फुल्ल झाल्याचंही महापालिकेने सांगितलं आहे. दरम्यान, कोविड केअर सेंटर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती महापालिकेने दिली.

दरम्यान, आतापर्यंत पालिकेच्या 1529 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. सफाई कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचारी कोरोनाच्या संकटातही काम करत असल्यामुळं त्यांना कोरोनाचा धोका आहे. पीपीई किट आणि इतर सुविधाही कमी पडत असल्यामुळं सध्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचं संकट आलं आहे.हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा