Advertisement

पालिकेच्या 300 निवासी डॉक्टरांना 54 हजार विद्यावेतन

कमी पगारावर काम करावे लागत असल्याची नाराजी दोन दिवसांपूर्वी कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली होती.

पालिकेच्या 300 निवासी डॉक्टरांना 54 हजार विद्यावेतन
SHARES

कमी पगारावर काम करावे लागत असल्याची नाराजी दोन दिवसांपूर्वी कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यानंतर तातडीने बैठक घेत कूपर, भाभा आणि इतर रुग्णालयांतील 300 डॉक्टरांना आता 54 हजार रुपये दरमहा विद्यावेतन देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन विद्यावेतन वाढवण्याचा निर्णय घेतला. 

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमडी, एमएस, डीएनबी डॉक्टर हे 300 डॉक्टर कूपर आणि इतर 16 रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरप्रमाणे आपली सेवा देत आहेत. कोरोनाच्या संकटात तर या डॉक्टरांना दिवसरात्र मेहनत करून सेवा बजवावी लागत आहे. मात्र 2016 पासून स्पेशलायझेशनसाठी पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना केवळ 14 हजार 800 रुपये वेतन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सीपीएस निवासी डॉक्टरांना इतर इतर निवासी डॉक्टरांप्रमाणे विद्यावेतन द्यावे अशी मागणी करण्यात येत होती.

या मागणीची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी तातडीने बैठक घेतली. यावेळी 300 निवासी डॉक्टरांना दरमहा 54 हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 



हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा