Advertisement

भारतातली पहिली बायोन ‘रॅपिड कोरोना टेस्ट किट’ तयार

बायोन (Bione) या भारतातील आनुवंशिक आणि सूक्ष्मजीव तपासणी करणाऱ्या संस्थेने देशातील पहिलं 'रॅपिड कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंग टेस्ट किट' बाजारात आणलं आहे.

भारतातली पहिली बायोन ‘रॅपिड कोरोना टेस्ट किट’ तयार
SHARES

बायोन (Bione) या भारतातील आनुवंशिक आणि सूक्ष्मजीव तपासणी करणाऱ्या संस्थेने देशातील पहिलं 'रॅपिड कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंग टेस्ट किट' बाजारात आणलं आहे. हे किट वापरायला अगदी सोपं असून या किटद्वारे काही मिनिटांतच आजाराचं निदान व्हायला मदत होते. कोरोना (covid-19) या प्राणघातक विषाणूची वेळेतच तपासणी करण्यात हे किट प्रभावी भूमिका बजावेल, असा संस्थेचा दावा आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)कडून या किटला परवानगी मिळाली आहे. गुणवत्ता तपासणीनंतर हे उत्पादन बाजारात आणण्यात येईल. 

५ ते १० मिनिटांत निकाल

कोव्हिड-१९ स्क्रीनिंग टेस्ट किट हे एक आयजीजी व आयजीएमवर आधारीत साधन असल्याने अवघ्या ५ ते १० मिनिटांत आजाराचं निदान करता येतं. हे किट मिळाल्यानंतर यूझरला आपलं बोट अल्कोहलने स्वच्छ करून त्यातून रक्त घेण्यासाठी किटसोबत दिलेल्या लँसेटचा वापर करावा लागेल. सोबत दिलेलं कार्ट्रिएज रक्ताच्या नमुन्याची तपासणी करतं. अशा प्रकारे ५ ते १० मिनिटांत तपासणीचा निकाल मिळतो.

हेही वाचा-  Coronavirus Update: कोरोनाचं निदान फक्त ५ मिनिटांत, रॅपिड टेस्टला परवानगी मिळाली

घरातल्या घरात तपासणी

जगभरातील सीई आणि एफडीए अधिकृत भागीदारांकडून हे उत्पादन तयार करण्यात आलं आहे. गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करूनच हे उत्पादन तयार करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहेर न पडता घरात काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून हे होम स्क्रीनिंग किट उपयोगाचं ठरेल. आजाराचं वेळेवर निदान झाल्यास संबंधित व्यक्तीला तत्काळ वेगळं ठेवल्यास या आजाराचा आणखी प्रसार रोखण्यासाठी या किटची महत्त्वाची मदत होईल. सामान्य स्थिती राहिल्यास कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर ऑर्डर दिल्यास हे किट २ ते ३ दिवसात उपलब्ध होईल. दर आठवड्यात २० हजार किट पुरवण्यास कंपनी सज्ज आहे. 

सरकारी पाठिंबा अपेक्षित

बायोनचे सीईओ डॉ. सुरेंद्र चिकारा म्हणाले, ‘‘आजच्या अभूतपूर्व परिस्थितीत कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंगट टेस्ट किट हे एक यशस्वी उत्पादन म्हणून फायदेशीर ठरू शकतं. निदानाचा वेळ कमी करून आम्ही भारताचा कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धात मदत करत आहोत. कोरोना व्हायरसच्या विरुद्ध क्रांती करण्यात सरकार आम्हाला पाठिंबा देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा