Advertisement

लॉकडाऊनच्या काळात बाळाच्या लसीकरणाची खबरदारी घेणं गरजेचं


लॉकडाऊनच्या काळात बाळाच्या लसीकरणाची खबरदारी घेणं गरजेचं
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी मुंबईसह देशभरात लॉडाऊनचं पालन केलं जात आहे. मात्र, या संकटकाळी बाळाला लसीकरण करणं सुरक्षित आहे की नाही अशा संभ्रमात अनेक पालक आहेत. मात्र, गरजेच्या लसी लांबणीवर न टाकता त्या वेळीच देणं आवश्यक आहे. त्यामुळं पालक आणि रुग्णालयांनी योग्य ती खबदारी घेत लसीकरण सुरूच ठेवणं आवश्यक आहे. जन्मानंतर काहीच तासांनी बाळाला लस देण्यास सुरवात होते. ५ वर्षापर्यंत हे लसीकरण नियमितपणं सुरूच असतं.

खारघर येथील मदरहुड हॉस्पिटलचे बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉ सुरेश बिराजदार सांगतात लसीकरण हा बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक असते. बाळाच्या जन्मानंतर त्याला बीसीजीची लस देतात. दम्यापासून बाळाचा बचाव त्यामुळं होतो. त्यानंतर ३ ते ६ महिन्याच्या वयात बाळाला पोलिओसह इतर रोगांपासून बचाव करण्यासाठी लस देण्यात येते. या लशी बाळासाठी फारच महत्त्वाच्या असतात. कोरोना साथीच्या काळात बरचसे पालक सध्या संभ्रमात आहेत.

या काळात लसीकरण करावे की नाही, कोणत्या लसी द्याव्यात? लसीकरण सुरक्षित आहे का? अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्याच्या काळात लसीकरण गरजेचे नाही, नंतर दिले तर चालेल, असेही काही डॉक्टर सांगत आहेत. परंतु हे सर्व चुकीचे आहे. लसीकरण सुरू राहणे अत्यंत म्हत्वाचे आहे. इबोलाच्या साथीनंतर गोवर, मलेरिया, टी. बी. ने सर्वांत जास्त मृत्यू झाले होते, हे विसरून चालणार नाही. पुढील काळातील गोवर, पिवळा ताप, पोलिओ, मेंदूज्वर, न्युमोनिया, गॅस्ट्रो, अशा आजारांमुळे होणारे मृत्यू वाचवायचे असतील तर लसीकरण सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका ओळखून किमान पहिल्या दीड वर्षांतील सर्व प्राथमिक लसी वेळेवर घेणे इष्ट राहील, असे भारतीय बालरोगतज्ञ संघटनेनं कळवलं आहे.

बाळाला लसीकरणावेळी 'अशी' घ्या खबरदारी

  • लसीकरणाच्या वेळी दवाखान्यात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी खूप काळजी घेतली जावी. 
  • डॉक्टर; तसेच स्टाफने सर्जिकल मास्क आणि ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. 
  • काही लसी एकत्र; तसेच एकाच दिवशी देता येऊ शकतात. 
  • लसीकरणाचे व आजाराचे पेशंट शक्यतो वेगवेगळ्या वेळेस आधी वेळ ठरवून बोलवावे
  • लसीकरणाला आलेल्या बाळाला ताप व सर्दी खोकला नाही ना याची खात्री करावी
  • आजी, आजोबांनी लसीकरणाला येणे टाळावे
  • बाळाबरोबर एकाच व्यक्तीने डॉक्टरांच्या केबिनमध्ये जावे
  • बाळ, पालक, डॉक्टर सर्वांनी मास्क घातलाच पाहिजे
  • पूर्व नियोजित वेळेनुसार लसी घ्याव्यात
  • डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन द्यावे



हेही वाचा -

Electricity Bill: गुड न्यूज! आता विजेचं बिल भरता येईल हप्त्यांमध्ये

Chinese Hacker Cyber Attack: ५ दिवसात ४० हजार चीनी हॅकर्सकडून सायबर हल्ले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा