Chinese hacker cyber attack: महाराष्ट्रात ५ दिवसांत चिनी हॅकर्सकडून ४० हजार सायबर हल्ले

चीनच्या हॅकर्सनी भारतातील २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा कट रचला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे.

Chinese hacker cyber attack: महाराष्ट्रात ५ दिवसांत चिनी हॅकर्सकडून ४० हजार सायबर हल्ले
SHARES

भारत आणि चीन मधील बिघडते संबध लक्षात घेता. भारताची अर्थ व्यवस्था आणखी खिळखिळी करण्यासाठी चीनी हँकर्सकडून आता सायबर हल्ले केले जात आहेत. आधिच चीनमधून आलेल्या कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त असताना. भारताची डोकेदुखी वाढवण्यासाठी चीनने  ५ दिवसात ४० हजार ३०० चीनी हॅकर्सच्या मदतीने सायबर हल्ले केल्याचे पुढे आले आहे. हे सायबर हल्ले करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचाः- Coronavirus Infected police कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील ५१ पोलिस शहिद

पूर्व लडाखमधील गलवान येथे घुसखोरी करणाऱ्या चीनीला  भारताने रोखत, त्यांची चारीबाजून कोंडी केल्यानंतर चीनने आधीच कोरोनाने त्रस्त असलेल्या भारताची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी चीनने त्यांचे  हॅकर्स भारतावर सायबर हल्ला करण्यासाठी तैनात केले आहे. मागील पाच दिवसात चीनी हॅकर्सकडून भारतावर ४० हजार ३०० सायबर हल्ले केल्याचे तपासात निश्पन्न झाले आहे. बँक, मुलभत सुविधा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत त्यांच्यावरील चीनकडून होणा-या सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे विशेष महानिरीक्षक(सायबर) यशस्वी यादव यांनी सांगितले. त्यातील बहुसंख्य हल्ले चीन मधील चेंगडू परिसरातून करण्यात आले आहेत, असे यादव यांनी स्पष्ट केले.तीन प्रकारचे हे हल्ले आहेत. त्यात डियानल ऑफ सर्विस, इंटरनेट प्रोटोकॉल हायजॅकिंग व फिशिंग या हल्ल्यांचा समावेश आहे. विशेष करून सरकारी विभागाना टार्गेट करण्यात येत आहे.

हेही वाचाः- dahi handi festival: यंदा थर लागणार नाहीत, दहीहंडीवर करोनाचं सावट

  चीनच्या हॅकर्सनी भारतातील २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा कट रचला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या  ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्लयामध्ये  भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा, आर्थिक प्रलोभन देणारा विषय  असलेला इमेल पाठवला जाईल.जसे की मोफत कोविड चाचणी, मोफत कोविड किट त्या इमेल मध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अश्या प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.

हेही वाचाः- Coronavirus pandemic:  ४० दिवसानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मुंबईत ८४६ नवे रुग्ण

   महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि वरील दाखविल्या प्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेल ला प्रतिसाद देऊ नका आणि covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका.सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईल साठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत  अँन्टी व्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईल मधील अँप नियमित पणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. आणि ते नियमितपणे बदलत राहा,तुमच्या महत्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या.प्रलोभने देणारे संशयास्पद इमेल उघडू नये. त्यातील लिंक वर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये.खोट्या आणि प्रलोभने देणा-या इमेल आणि वेबसाईट पासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्वाची माहिती जसे कि युजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका.असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा