Advertisement

Coronavirus pandemic: ४० दिवसानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मुंबईत ८४६ नवे रुग्ण

मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ४५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३४ हजार ५७६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic:  ४० दिवसानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मुंबईत ८४६ नवे रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे २४८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ८४६ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी  दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२ रुग्ण दगावले आहेत. तर २२ जून रोजी २० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २१ जून रोजी रोजी एकूण ४१जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे ८४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६८ हजार ४८१ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे ४५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३४ हजार ५७६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- salon and beauty parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ३९ हजार १० नमुने पॉझिटिव्ह (१७.३१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ५ हजार  १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे. गेल्या ४८ तासात नोंद झालेल्या ७५ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-४२, भिवंडी-निजामपूर मनपा-१, धुळे मनपा-१, पुणे-१, पुणे मनपा-८, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-१, सातारा-१, सांगली-१, रत्नागिरी-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद-८, अकोला -१, अमरावती मनपा-१,  यवतमाळ-१, बुलढाणा-२ अशाप्रकारे जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील मृत्यूंची नोंद झाली आहे.

० अँक्टीव कंटेनमेंट झोन   -  ७७०

० अँक्टीव सील बद इमारती  -  ५९५१

० २४ तासातील  संपर्काचा शोध अति जोखीम   ५७४६

० सध्या CCC1मधील अति जोखीमीचे संपर्क   १७६१४

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा