Advertisement

Coronavirus updates: चिंताजनकi मुंबईत दिवसभरात वाढले २१८ कोरोनाबाधित रुग्ण

मुंबईत केवळ एकाच दिवसात २१८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ९९३ झाली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५४७ एवढी झाली आहे.

Coronavirus updates: चिंताजनकi मुंबईत दिवसभरात वाढले २१८ कोरोनाबाधित रुग्ण
SHARES

मुंबईत केवळ एकाच दिवसात २१८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ९९३ झाली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५४७ एवढी झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या निश्चितच सरकारच्या चिंतेचा विषय ठरली आहे. या वाढणाऱ्या रुग्णसंख्येकडे पाहता मुंबईतील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आता राज्य राखीव दलाची मदत घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी दिली होती.

मुंबई महापालिकेने कोरोनाबाधितांची आकडेवारी सर्वांचीच काळजी वाढवणारी आहे. महापालिकेच्या माहितीनुसार दिवसभरात २९२ कोरोना संशयितांना शहरांतील विविध रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. तर २१८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा हा ९९३ वर पोहोचला आहे. तसंच मुंबईत एका दिवसात करोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत आतापर्यंत ६४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई महापालिकेच्या जीएस वाॅर्डमध्ये सर्वाधिक १९९ रुग्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ ई वाॅर्डमध्ये ६९, डी वाॅर्डमध्ये ६१, केब्ल्यू वाॅर्डमध्ये ५१ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. हे चारही वाॅर्ड अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

दरम्यान, लाॅकडाऊनचं पालन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत मिळावी यासाठी गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात येईल. नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रस्त्यांवरील गर्दीवर  लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबतही निर्णय झाला आहे. सीसीटीव्ही, एसआरपीएफ, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा