मुंबईच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक महत्त्वाचा बदल दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांमुळे तरुण नेतृत्वाची नवी लाट पुढे आली आहे.
22 ते 29 वयोगटातील तब्बल 12 नवनिर्वाचित नगरसेवक Gen Z पिढीतील आहेत.
या तरुण नगरसेवकांमध्ये डॉक्टर, एमबीए पदवीधर, सामाजिक कार्यकर्ते, डिझायनर्स यांचा समावेश आहे. तर काहीजण राजकीय वारसा असलेले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर आणि नव्या दृष्टिकोनातून वॉर्डमधील समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
वॉर्ड क्रमांक 151 मधून निवडून आलेले काशिश फुलवारिया हे सर्वात तरुण नगरसेवक आहेत.
काही ज्येष्ठ नगरसेवक उपस्थित असले तरी, बहुसंख्य सदस्य मध्यमवयीन आहेत, असे चित्र सध्या पालिकेत पाहायला मिळते.
हेही वाचा
