Advertisement

अजित पवार विमान अपघात: आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न पण...

बारामतीत झालेल्या विमान अपघातापूर्वी वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा अखेरचा प्रयत्न केला होता.

अजित पवार विमान अपघात: आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न पण...
SHARES

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले.

प्राथमिक अहवालांनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला; मात्र विमान नियंत्रणाबाहेर गेल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. 

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) माहितीनुसार, मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानातील पाचही जण दोन क्रू मेंबर्स आणि तीन प्रवासी, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि एक सहकारी यांचा समावेश होता. सकाळी 8.45 वाजता धावपट्टीजवळ विमान कोसळल्याने मृत्युमुखी पडले.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी होणाऱ्या जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी ज्येष्ठ नेते अजित पवार चार इतर व्यक्तींंसह बारामतीकडे जात होते. मात्र आज सकाळी 8.45 वाजता त्यांच्या विमानाला आपत्कालीन परिस्थितीत क्रॅश-लँडिंग करावे लागले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानात एकूण पाच जण होते. या विमानात अजित पवार यांच्यासह आणखी दोन कर्मचारी (एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी – PSO आणि एक सहाय्यक) तसेच दोन क्रू मेंबर्स प्रवास करत होते.

दुर्दैवी विमान अपघातात त्यांचा मृत्यू होण्याच्या अवघ्या तासभर आधी, अजित पवार यांनी फेसबुक आणि ट्विटरवर लाल लजपतराय यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते,

“महान स्वातंत्र्यसैनिक, स्वराज्याचे उद्घोषक, ‘पंजाब केसरी’ लाल लजपतराय जी यांना विनम्र अभिवादन. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. त्यांची देशभक्ती आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.”



हेही वाचा

मोठी बातमी! विमान अपघातात अजित पवार यांचे निधन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा