Advertisement

मराठी कलाकारांच्या एरियात शिरला कोरोना, गोरेगावचं बिंबीसार नगर सील

मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील बिंबीसार नगरमध्ये (bimbisar nagar) कोरोनाबाधित (Coronavirus) व्यक्ती आढळून आल्याने हा संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला. बिंबीसार नगरमध्ये मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले कलाकार राहतात.

मराठी कलाकारांच्या एरियात शिरला कोरोना, गोरेगावचं बिंबीसार नगर सील
SHARES

मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील बिंबीसार नगरमध्ये (bimbisar nagar) कोरोनाबाधित (Coronavirus) व्यक्ती आढळून आल्याने हा संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला. बिंबीसार नगरमध्ये मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले कलाकार राहतात. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात मुंबई महापालिकेकडून (bmc) निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

हेही वाचा - मुंबई पोलिस आयुक्त आज मुंबईकरांशी संवाद साधणार

प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर (marathi actor jayant wadkar) यांच्या इमारतीत राहणारी ही कोरोनाबाधित व्यक्त असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु त्याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. कोरोनाबाधित (coronavirus positive) व्यक्ती एक महिला असून ती शिक्षणासाठी लंडनला गेली हाेती. तिथंच तिला कोरोनाची (covid-19) लागण झाल्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ती लंडनहून पुन्हा मुंबईत परतली होती. तिच्या संपर्कात आल्यामुळे या महिलेचे आई-वडील, भाऊ आणि नोकरालाही कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. या चौघांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

बिंबीसार नगरमध्ये सुबोध भावे, जयवंत वाडकर, आतिशा नाई यांसारखे अनेक मराठी कलाकार राहतात. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिंबीसार नगरमध्ये निर्जंतुकीकरण करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय बिंबीसार नगरमध्ये कुणालाही प्रवेश करण्यास तसंच बाहेर जाण्यास बंदी केली आहे.  

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२५ वर पोहाचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी राज्यात आणखी नवीन ५ करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईतील १, पुण्यात २ तर बुलढाण्यात २ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा- आर्थिक संकटाला तोंड देण्यास तयार रहा, शरद पवार यांचा इशारा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा