Advertisement

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ संशयित, परिसर सील

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) ४ संशयित रुग्ण (Coronavirus suspects) आढळू आल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांकडून सील करण्यात आला आहे.

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ संशयित, परिसर सील
SHARES

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) ४ संशयित रुग्ण (Coronavirus suspects) आढळू आल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स लावत कोळीवाड्यातून (Worli koliwada) कोणालाही बाहेर येण्यास किंवा आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून सध्या या परिसराचं निर्जुंतुकीकरण सुरु आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९५ यापैकी ३४ रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला असून ५जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे चारही संशयित हून जास्त वयोगटाचे असून यापैकी एकाही जणाने परदेशी प्रवास केलेला नाही. तरीही त्यांना कोरोनाची (covid-19) लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वरळी कोळीवाडा ((Worli koliwada)) ही दाटीवाटीने वसलेली वस्ती असल्याने इथं कोरोना पसरण्याचा मोठा धोका मानला जात आहे. या चौघांना कोरोनाची लागण कुणापासून झाली आणि या चौघांच्या संपर्कात कोण कोण आले याचा तपास आता घेतला जाणार आहे. 

तोपर्यंत पोलिसांनी या परिसरात कोरोना संशयित आढळल्याची माहिती कोळीवाड्यातील रहिवाशांना देण्यात आली आहे. तसंच तातडीने निर्जुंतुकीकरणाचं कामही हाती घेण्यात आलं आहे.   

या चौघांपैकी एक व्यक्ती ट्राॅम्बे परिसरात आचाऱ्याचं काम करत होता. तर इतर तिघेजणही स्थानिक परिसरातच काम करणारे आहेत. या चौघांच्या संपर्कात आलेल्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे कोरोना आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचून समाजात पसरत असल्याची भीती या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा