Advertisement

Good News! राज्यातील पहिल्या कोरोनाबाधिताला डिस्चार्ज!!


Good News! राज्यातील पहिल्या कोरोनाबाधिताला डिस्चार्ज!!
SHARES

महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त रुग्ण अशी नोंद झालेल्या दाम्पत्याला गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे दाम्पत्य दुबईहून मुंबईवाटे पुण्यात परतले होते. उपचारांदरम्यान घेतलेल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन तसंच टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर रुग्णालयालच्या रुग्णवाहिकेतून त्यांना घरी सोडण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी ही गोड बातमी ठरली आहे.  

सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ११५ वर जाऊन पोहोचला आहे. वाढ झालेल्या रुग्णांमध्ये सांगलीतल्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. त्यामुळे सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे.

Maharashtra break up 115 (112 active cases and 3 deaths)

  • Pimpri : 12
  • Pune : 19
  • Mumbai : 44 
  • Nagpur : 4
  • Yamtval : 4
  • Kalyan : 5
  • Navi Mumbai : 4
  • A'nagar : 3
  • Panvel : 1
  • Thane : 2
  • Ulhasnagar : 1
  • Aurangabad : 1
  • Ratnagiri : 1 
  • Satara 2
  • Islampur sangali 9

‘असा’ पसरला कोरोना  

दुबईहून मुंबईवाटे पुण्यात आलेल्या या दाम्पत्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना नायडू रुग्णालयात ९ मार्च रोजी दाखल करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील पहिले कोरोनारुग्ण म्हणून त्यांची नोंद झाली होती. ते मुंबई विमानतळावरून ज्या टॅक्सीने पुण्यात आले होते. त्या टॅक्सी ड्रायव्हरला तसंच त्यांच्या मुलीला देखील त्यांच्या संपर्कात येऊन कोरोनाची लागण झाली हाेती. 

घरातच राहावं लागणार

या दाम्पत्यापाठोपाठ आता त्यांच्या मुलीची तसंच ड्रायव्हरची देखील टेस्ट करण्यात येणार आहे. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर या दोघांनाही घरी सोडण्यात येणार आहे. या दाम्पत्याला नायडू रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आलं. डाॅक्टरांनी या दाम्पत्याला पुढील १४ दिवस घरातच क्वोरेंटाईन राहण्यास सांगण्यात आलं आहे. कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळावे लागणार आहेत. ते ज्या भागात राहतात, तेथील रहिवाशांनी त्यांच्या संपर्कात येऊ नये, तसंच ते इतरांच्या संपर्कात जाऊ नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत देश पूर्णपणे लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा या काळात बंद राहणार आहे. लोकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा