Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

coronavirus update: राज्यात पावणेदोन लाख आयसोलेशन खाटा उपलब्ध

राज्यात कोरोनासाठी (coronavirus) त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या ३ वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (isolation beds) खाटांची संख्या आहे

coronavirus update: राज्यात पावणेदोन लाख आयसोलेशन खाटा उपलब्ध
SHARES

राज्यात कोरोनासाठी (coronavirus) त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या ३ वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (isolation beds) खाटांची संख्या आहे, तर ७२४८ अतिदक्षता (ICU) खाटांची उपलब्धता आहे. सुमारे तीन हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किट्स तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी सांगितलं.

३ श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी- १ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- २ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय व निगा केंद्र तर श्रेणी ३ मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो. या तिन्ही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा - देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी सरकारने उचलले 'हे' पाऊल

लक्षणांनुसार उपचार

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसांठी श्रेणी १ मध्ये उपचार सुविधा असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी श्रेणी २ मध्ये तर ज्यांना लक्षणे नाहीत अशांसाठी श्रेणी ३ मध्ये उपचार केला जातो. राज्यात श्रेणी १ चे २४६ अधिकृत कोरोना रुग्णालये असून त्यामध्ये एकूण ३२ हजार ८६१ विलगीकरण खाटा आहेत त्यात अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे.

निगा केंद्र  कार्यरत

श्रेणी २ मधील ५१७ अधिकृत कोरोना रुग्णालय व निगा केंद्र  कार्यरत असून त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटा मिळून सुमारे ३१ हजार विलगीकरण खाटा आहेत. श्रेणी ३  मधील ९१४ कोरोना रुग्ण निगा केंद्र कार्यरत आहेत. त्यात १ लाख २० हजार ६११ विलगीकरण खाटा आहेत. अशा प्रकारे राज्यात एकूण १६७७ रुग्णालये तीनही श्रेणीतील असून त्यात १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटा आहेत. त्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ६२ हजार ६४० तर कोरोनाबाधितांसाठी १ लाख १३ हजार ७०७ विलगीकरण खाटांचा समावेश आहे. या तिन्ही श्रेणीतील रुग्णालयांसाठी खाटांची, पीपीई, किटस् तसेच व्हेंटिलेटर्सची संख्या पुरेशी आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने, २५ हजार अर्ज

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा