Advertisement

बीकेसीच्या कोरोना रुग्णालयातील १ हजार रुग्ण कोरोनामुक्त

बीकेसी या कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं १ हजाराचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे अद्याप एकाही मृत्यूची नोंद या रुग्णालयामध्ये झालेली नाही.

बीकेसीच्या कोरोना रुग्णालयातील १ हजार रुग्ण कोरोनामुक्त
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक भागांत कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांसह या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अशाप्रकारचं कोविड सेंटर असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या(बीकेसी) मैदानावर उभारलेल्या कोरोना रुग्णालयातील अनेक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. बीकेसी या कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं १ हजाराचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे अद्याप एकाही मृत्यूची नोंद या रुग्णालयामध्ये झालेली नाही.

वांद्रे येथील बीकेसीतील १ हजार खाटांच्या या रुग्णालयातून ५० वर्षांवरील ४५२ रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आलं. या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब इतर आजारही होते. मात्र, वेळेत उपचार आणि योग्य काळजी घेतल्यानं हे सर्व रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

रुग्णालयात १,७५४ रुग्णांवर उपचार दिले असून यातील १,००९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णालयातील ४५ टक्के रुग्ण पहिल्या ५ दिवसांतच बरे झाल्याची माहिती समोर येत आहे. निसर्ग वादळानंतर रुग्णालयात दाखल झालेल्यांची ही आकडेवारी आहे. या रुग्णालयात १ हजार खाटांपैकी ५०० खाटांवर ऑक्सिजनची सोय आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १९८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १५११ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५११ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७९ हजार १४५ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ९३ हजार रुग्णांनी कोरावार मात केलेली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४४ हजार ७९१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा