Advertisement

मुंबईतील रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा कोरोनासाठी आरक्षित ठेवा, टास्क फोर्सची मोठी सूचना

मुंबईतील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयातील (private and government hospital) ८० टक्के खाटा कोरोनाबाधित (reservation for corona patient) रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याची सूचना राज्य सरकारने नेमलेल्या नामांकीत डाॅक्टरांच्या टास्क फोर्सने प्रशासनाला केली आहे.

मुंबईतील रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा कोरोनासाठी आरक्षित ठेवा, टास्क फोर्सची मोठी सूचना
SHARES

मुंबईतील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयातील (private and government hospital) ८० टक्के खाटा कोरोनाबाधित (reservation for corona patient) रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याची सूचना राज्य सरकारने नेमलेल्या नामांकीत डाॅक्टरांच्या टास्क फोर्सने प्रशासनाला केली आहे. 

उच्चांकी गाठणार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे बघता मुंबईत येत्या काही दिवसांत कोरोना उच्चांकी संख्या गाठेल, असा अंदाज आहे. गणितीय पद्धतीने केलेल्या मांडणीनुसार मुंबईतील किमान २० हजार लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं. त्यामुळे आधीच खबरदारी घेऊन तयार राहावं, अशी सूचना टास्क फोर्सने (task force) केली आहे.

रुग्णालये ताब्यात घ्या

मुंबईतील सकारी आणि खासगी रुग्णालयात आपत्कालीन सेवा पुरवण्यासाठी एकूण ३० हजार खाटा उपलब्ध आहेत. त्यातील २२ हजार खाटा फक्त कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित करणं आवश्यक आहे. येत्या १ ते२ दिवसांत सरकारला याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. देशातील विविध महानगरांमध्ये तेथील सरकारांनी आधीच खासगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. परंतु राज्यात अजूनही सरकारने काही अपवाद वगळता तशी कार्यवाही केलेली नाही.

हेही वाचा - क्वारंटाइन सेंटरसाठी वानखेडे स्टेडियमची पालिकेकडून मागणी

मोजक्या आजारांवरच उपचार

कोरोनाग्रस्तांवर उचारासाठी मोठ्या संख्येने खाटा आवश्यक असल्याने सरकारला हा निर्णयही तातडीने घ्यावा लागेल. फक्त खासगी रुग्णालयांना विश्वासात घेऊन ही रुग्णालये ताब्यात घ्यायची की आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली घ्यायची हे ठरवणं गरजेचं आहे. कोरोनाबाधितांना प्राधान्य देण्यासाठी प्रसूती, कर्करोग, डायलिसिस, हृदयरोग, स्ट्रोक आणि ट्रॉमासारखे आजार वगळून इतर सर्व नियमित उपचार थांबवावे लागतील, असंही टास्क फोर्सने सुचवल्याचं समजत आहे. 

समितीत कोणाचा समावेश?

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय उपचार प्रणाली सुसज्ज ठेवण्यास मार्गदर्शन करणे, कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी ठेवण्यास उपाययोजना सुचवणे, राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहाय्य करणे इ. साठी राज्य सरकारने डॉ. संजय ओक यांच्या नेतृत्वाखालील डॉ. झहीर उडवाडिया, डॉ. संतोष नागावकर, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. राहुल पंडित, डॉ. एन. डी. कर्णिक, डॉ. झहिर विरानी, डॉ. प्रवीण बांगर आणि डॉ. ओम श्रीवास्तव ९ सदस्यीय तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा