Advertisement

क्वारंटाइन सेंटरसाठी वानखेडे स्टेडियमची पालिकेकडून मागणी

वानखेडे मैदान क्वारंटाइन सुविधेसाठी आपल्या ताब्यात द्यावं अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई महापालिकेने केली आहे.

क्वारंटाइन सेंटरसाठी वानखेडे स्टेडियमची पालिकेकडून मागणी
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी खाटांची संख्या अपुरी पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन वानखेडे मैदान क्वारंटाइन सुविधेसाठी आपल्या ताब्यात द्यावं अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई महापालिकेने केली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने कोरोनाविरुद्ध लढ्यात मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला याआधी ५० लाखांची आर्थिक मदत दिली होती. तसंच गरज लागल्यास आपल्या अखत्यारीत असणारी मैदानं क्वारंटाइन सुविधेसाठी वापरण्याची तयारीही दाखवली होती.

पालिकेने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमला विलगीकरण सेंटरमध्ये रूपांतरित करण्याच्या मागणीचे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिले आहे. या मैदानाचा वापर मुंबईच्या ‘ए’ प्रभागात राहणाऱ्या आपत्कालीन कर्मचार्‍यांसाठी आणि कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी केला जाईल. या जागेचे जे काही भाडे असेल तेहीवेळोवेळी दिले जाईल,  असे या पत्रात म्हटले आहे.

वानखेडेमधील क्लब हाऊस, हॉल, हॉटेल ,इतर खोल्या यांचा वापर महापालिकेला रुग्णखाटा ठेवण्यासाठी होईल. तसेच, याबाबत एमसीएकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते असही या पत्रात म्हटलं आहे. 



हेही वाचा -

लाॅकडाऊनचा चौथा टप्पा कसा? मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा

मुंबईत ३१ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांसाठी आणखी ३१०० बेड्स




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा