Advertisement

राज्यातील 'या' ५ जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं घट झाल्याची दिलासादायक बाब कोविड रुग्णसंख्येवरुन स्पष्ट दिसत आहे.

राज्यातील 'या' ५ जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण
SHARES

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं घट झाल्याची दिलासादायक बाब कोविड रुग्णसंख्येवरुन स्पष्ट दिसत आहे. राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख १ हजार ७५२ सक्रिय रुग्ण होते. ही संख्या २२ एप्रिल २०२१ मध्ये दुप्पट होऊन ६ लाख ९९ हजार ८५८ वर पोहोचली; मात्र आता एप्रिलनंतर या संख्येत घट होऊन ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३३ हजार १५९ वर पोहोचली. राज्यात सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे.

जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली. त्यानंतर दरदिवशी १० हजारांच्या दरम्यान रुग्णसंख्या होती. मात्र आता ऑगस्टनंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या थेट २ ते अडीच हजारांच्या दरम्यान आहे. सध्या राज्यात ३३ हजार १५९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५ जिल्ह्यांत अजूनही चिंता कायम असून पुणे गेल्या २ महिन्यांपासून अव्वल यादीत आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. त्यानंतर अहमदनगर, ठाणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. या ५ जिल्ह्यांतून ७४ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे.

आतापर्यंत ३३ हजार ४४९ सक्रिय रुग्णांपैकी २.७४ टक्के म्हणजेच ९२२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर जवळपास ६.५४ टक्के आयसीयूमधील रुग्ण असून २,२०५ एवढे आहेत तर ५,४५४ गंभीर रुग्ण असून याचे प्रमाण १६.२१ टक्के आहे तर ५६ टक्क्यांहून अधिक लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा