Advertisement

हिंदुजा रुग्णालयाचा आसपासचा परिसर पूर्णपणे बंद

हिंदुजा हॉस्पिटल जवळील पूर्ण परिसर वाहतूकीसाठी आणि रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गुरुवारी रुग्णालयात एका डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हिंदुजा रुग्णालयाचा आसपासचा परिसर पूर्णपणे बंद
SHARES

गुरुवारी संध्याकाळी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्या रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं चाचणीतून समोर आलं आहे. फक्त एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


हॉस्पीटल जवळील परिसर बंद

रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळताच हिंदुजा हॉस्पीटल जवळील ५ किलोमीटरचा परिसर सिल करण्यात आला आहे. या परिसरातील आसपासचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला. वाहतूक सेवा तसंच या परिसरात कुणाला फिरकण्याची देखील कुणाला परवानगी नाही.


स्टाफना वेगळा राहण्याचा सल्ला?

हिंदुजा हॉस्पीटलमधल्या डॉक्टरांना देखील वेगळं राहण्याचे आदेश दिल्याचं बोललं जातंय. रुग्णालयातील ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या स्टाफला वेगळं राहण्यास सांगितलं गेल्याची चर्चा आहे. हॉस्पीटलचा स्टाफ हा पुष्टी झालेल्या रुग्णांच्या निकट संपर्कात होता. म्हणून त्यांना पुढील १४ दिवस अलिप्त राहण्याची सूचना देण्यात आली आहे. या  लोकांचे नमुने घेण्यात आले असून त्यांना तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. यासंदर्भात हिंदुजा रुग्णालयाकडून कुठलीच पुष्टी करण्यात आली नाही. 


यापूर्वीही अशीच घटना

मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये यापूर्वी देखील कोरोनाबाधित रुग्ण भरती झाला होता. त्यांनी परदेशी दौरा करून आल्याची बातमी हिंदुजा स्टाफला सांगितली नव्हती. डॉक्टरांना ही माहिती कळाल्यावर त्यांना कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर हिंदूजाच्या रुग्णालयानं खबरदारी म्हणून रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसच्या आवश्यक त्या चाचण्या करून घेतल्या होत्या. डॉक्टर आणि नर्सेसच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल झाला.


दरम्यान कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांचा आकडा १५०च्या वर गेला आहे. राज्य सरकारनं देखील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबावा यासाठी प्रयत्न करत आहे.   



हेही वाचा

मुंबईत कोरोनामुळे एका डॉक्टराचा मृत्यू, कुटुंबातील ६ जण पॉझिटिव्ह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा