Advertisement

मुंबईत कोरोनामुळे एका डॉक्टराचा मृत्यू, कुटुंबातील ६ जण पॉझिटिव्ह

हिंदुजा रुग्णालयात गुरुवारी रात्रीच एका ८२ वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला.

मुंबईत कोरोनामुळे एका डॉक्टराचा मृत्यू, कुटुंबातील ६ जण पॉझिटिव्ह
SHARES

देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आणखी एका रुग्णाचा Coronavirus नं बळी घेतल्याचं समोर आलं आहे. माहिममधल्या हिंदुजा रुग्णालयात गुरुवारी रात्रीच एका ८२ वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मुंबईतील हा सहावा मृत्यू आहे.


कुटुंबातील ६ जण पॉझिटिव्ह

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांचा नातू १२ मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व ६ जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


रुग्णांचा आकडा १४७वर

कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ७००च्या वर आहे. तर महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १४७वर गेला आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकतंच सांगलीतल्या एकाच कुटुंबातल्या १२ जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.


१९ रुग्णांची घरवापसी

दरम्यान, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच, राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा

सांगलीत एकाच कुटुंबात १२ जणांना कोरोनाची लागण, रुग्णांचा आकडा १४७ वर

राज्य सरकार मेडिकल स्टाफचा आरोग्य विमा काढण्याच्या विचारात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा