Advertisement

कोरोनाचा हाहाकार! राज्यात दिवसभरात 65 जणांचा मृत्यू, तर 2250 नवे रुग्ण


कोरोनाचा हाहाकार! राज्यात दिवसभरात 65 जणांचा मृत्यू, तर 2250 नवे रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या  39 हजार 297 इतकी झाली आहे. बुधवारी राज्यात 2250 नविन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात 679 कोरोनाबाधित रुग्णांना आज घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 10 हजार 3187 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 26 हजार 581 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 7 हजार 72 नमुन्यांपैकी 2 लाख 67 हजार 775 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 39 हजार 297 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 4 हजार 692 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 26 हजार 752 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 65 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1390 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 41, पुण्यात 13, नवी मुंबईमध्ये 3, पिंपरी- चिंचवड 2, सोलापूरात 2, उल्हासनगरमध्ये 2, तर औरंगाबाद  शहरात 2  मृत्यू झाले आहेत. बुधवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 46  पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 65 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 32  रुग्ण आहेत तर 31  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 2 जण 40 वर्षांखालील आहे. या 65 रुग्णांपैकी 48 जणांमध्ये (74 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 24,118 (841)

ठाणे: 309 (4) 

ठाणे मनपा: 1865 (33)

नवी मुंबई मनपा: 1593(27)

कल्याण डोंबिवली मनपा: 612 (6)

उल्हासनगर मनपा: 130

भिवंडी निजामपूर मनपा: 74 (3)

मीरा भाईंदर मनपा: 317 (4)

पालघर:68  (3)

वसई विरार मनपा: 407 (11)

रायगड: 279 (5)

पनवेल मनपा: 253 (11)

*ठाणे मंडळ एकूण: 30,025 (950)*

नाशिक: 105

नाशिक मनपा: 82 (2)

मालेगाव मनपा: 681 (34)

अहमदनगर: 46 (5)

अहमदनगर मनपा: 18

धुळे: 13(3)

धुळे मनपा: 71(6)

जळगाव: 233  (29)

जळगाव मनपा: 70 (4)

नंदूरबार: 25(2)

*नाशिक मंडळ एकूण: 1344 (85)*

पुणे: 235 (5)

पुणे मनपा: 4049(215)

पिंपरी चिंचवड मनपा: 193 (6)

सोलापूर: 10 (1)

सोलापूर मनपा: 495  (26)

सातारा: 170 (2)

*पुणे मंडळ एकूण: 5152 (255)*

कोल्हापूर: 120  (1)

कोल्हापूर मनपा: 19

सांगली: 49

सांगली मिरज कुपवाड मनपा: 8(1)

सिंधुदुर्ग: 10

रत्नागिरी:  116 (3)

*कोल्हापूर मंडळ एकूण: 322 (5)*

औरंगाबाद:16

औरंगाबाद मनपा: 1066 (36)

जालना: 38

हिंगोली: 107

परभणी: 6 (1)

परभणी मनपा: 3

*औरंगाबाद मंडळ एकूण: 1236 (37)*

लातूर: 47 (2)

लातूर मनपा: 3

उस्मानाबाद: 11

बीड: 5

नांदेड: 9

नांदेड मनपा: 71 (4)

*लातूर मंडळ एकूण: 146 (6)*

अकोला: 29 (2)

अकोला मनपा: 281 (15)

अमरावती: 8 (2)

अमरावती मनपा:  115 (12)

यवतमाळ: 102

बुलढाणा: 34 (3)

वाशिम: 8

*अकोला मंडळ एकूण:577 (34)*

नागपूर: 2

नागपूर मनपा: 421 (6)

वर्धा: 3 (1)

भंडारा: 7

गोंदिया: 3

चंद्रपूर:  1

चंद्रपूर मनपा: 4

गडचिरोली: 6

*नागपूर मंडळ एकूण:  447 (7)*

इतर राज्ये: 48 (11)

*एकूण:  39 हजार 297  (1390)*


*(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 20202 पासूनच्या 242 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.  आय सी एम आर पोर्टलवरील माहितीचे डेटा क्लिनिंग सुरु असल्याने एकूण रुग्ण संख्येत बदल होऊ शकतो.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)*

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1849 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 15 हजार 495 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 65.11  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा