Advertisement

अरे बापरे ! राज्यात ५५३७ कोरोनाचे नवे रुग्ण, वाचा तुम्हच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या किती झाली

राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे.

अरे बापरे ! राज्यात ५५३७ कोरोनाचे नवे रुग्ण, वाचा तुम्हच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या किती झाली
SHARES

राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज २२४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी  १ लाख ८० हजार २९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.१६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८ हजार  ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ६९ मृत्यू हे मुंबई मनपा-६, ठाणे मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा- १, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-३, वसई-विरार मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-८, पुणे-४, पुणे मनपा-२३, पिंपरी चिंचवड मनपा-१, सोलापूर मनपा-३, सिंधुदूर्ग-१, जालना-३, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (७९,१४५), बरे झालेले रुग्ण- (४४,७९१), मृत्यू- (४६३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,६७५)

ठाणे: बाधीत रुग्ण- (३९,३१६), बरे झालेले रुग्ण- (१५,६२१), मृत्यू- (१०१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१,६३१)

पालघर: बाधीत रुग्ण- (६०६४), बरे झालेले रुग्ण- (२६५४), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२९९)

रायगड: बाधीत रुग्ण- (४५६३), बरे झालेले रुग्ण- (२१८६), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२७३)

रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (४४५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)

पुणे: बाधीत रुग्ण- (२३,३१७), बरे झालेले रुग्ण- (११,५४५), मृत्यू- (७८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,९८९)

सातारा:  बाधीत रुग्ण- (१११७), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४३)

सांगली: बाधीत रुग्ण- (३९६), बरे झालेले रुग्ण- (२२८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५७)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (७१७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (२६५२), बरे झालेले रुग्ण- (१५६३), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२०)

नाशिक: बाधीत रुग्ण- (४३७६), बरे झालेले रुग्ण- (२३२२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८३२)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (४३२), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)

जळगाव: बाधीत रुग्ण- (३५०७), बरे झालेले रुग्ण- (२००६), मृत्यू- (२४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२५६)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१७८), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९९)

धुळे: बाधीत रुग्ण- (१०९६), बरे झालेले रुग्ण- (५९४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४४)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (५६५१), बरे झालेले रुग्ण- (२४६०), मृत्यू- (२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३५)

जालना: बाधीत रुग्ण- (५८३), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२)

बीड: बाधीत रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)

लातूर: बाधीत रुग्ण- (३५०), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३६)

परभणी: बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)

नांदेड: बाधीत रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (२२३), बरे झालेले रुग्ण- (१७१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)

अमरावती: बाधीत रुग्ण- (५८७), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०)

अकोला: बाधीत रुग्ण- (१५४४), बरे झालेले रुग्ण- (१०७९), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८६)

वाशिम: बाधीत रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२५१), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२९६), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७)

नागपूर: बाधीत रुग्ण- (१५०६), बरे झालेले रुग्ण- (११९८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)

वर्धा: बाधीत रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६)

भंडारा: बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)

एकूण: बाधीत रुग्ण-(१,८०,२९८), बरे झालेले रुग्ण-(९३,१५४), मृत्यू- (८०५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टीव्ह रुग्ण-(७९,०७५)

 (टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १२९ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६९, मीरा भाईंदर -२६, ठाणे मनपा -१७, कल्याण डोंबिवली -४, जळगाव – ३, पुणे -३,नवी मुंबई -१, उल्हास नगर -१, भिवंडी -१, पालघर -१, वसई विरार -१, धुळे -१ आणि अकोला-१ यांचा समावेश आहे. हे १२९ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
संबंधित विषय
Advertisement