Advertisement

चिंताजनक! कोरोनाचे दिवसभरात 998 रुग्ण, 25 जणांचा बळी


चिंताजनक!  कोरोनाचे दिवसभरात 998 रुग्ण, 25 जणांचा बळी
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, या महामारीने मुंबईत आतापर्यंत 621 जणांचा बळी घेतला आहे. तर गुरूवारी मुंबई दिवसभरात 998 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी  दिवसभरात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

मागील दिवसांमध्ये मुंबईत कोरोना मृत्यूदर खाली आला होता. मात्र, पुन्हा मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी  भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 रुग्ण दगावले आहेत तर 11 मे रोजी 20 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 12 मे रोजी रोजी एकूण 28 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे 998 नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 16 हजार 579  इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात  करोनाचे 443 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 4 हजार 234 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती

1) कोरोना बाधित रुग्णांमधील 59 टक्के म्हणजेच 5228 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे विरहित आहेत. 

2) 39 टक्के म्हणजेच 3209 रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्येम लक्षणे आढळून आली आहेत.

3) 5 टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे असून त्यातील 236 म्हणजेच 3 टक्के नागरिकांना आँक्सीजनची आवश्यकता, तर 92 रुग्ण म्हणजेच 1 टक्का रुग्ण व्हँन्टीलेटरवर आहेत. 

 4) 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा