Advertisement

वेदनादायक! आणखी एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

"कुणी पाच कोटी दिले तर कुणी पाचशे कोटी, आम्ही आमचे आयुष्य देतोय, अशी भावनिक पोस्ट करत, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते.

वेदनादायक! आणखी एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू
SHARES
"कुणी पाच कोटी दिले तर कुणी पाचशे कोटी, आम्ही आमचे आयुष्य देतोय, अशी भावनिक पोस्ट करत, नागरिकांना आवाहन करणाऱ्या  सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा कोरोनाने शनिवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल कुलकर्णी (32) असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून ते शाहू नगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तरूण आणि मनमिळावू स्वभावाचे असलेल्या कुलकर्णी यांच्या निधनामुळे पोलिस वर्तुळात हळहळ व्यक्त होतं आहे. कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता 1140 वर जाऊन पोहचला आहे. कोरोना या संसर्ग रोगाने आतापर्यंत  आठ पोलिसांचे बळी घेतलेले आहे. 

मुंबई पोलिस दलातील शाहू नगर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल कुलकर्णी हे कार्यरत होते.  मागील अनेक दिवसांपासून त्यांना ताप, सर्दी आणि खोकला येत होता. त्यामुळे त्यांनी 13 मे रोजी कोरोनाची तपासणी केली होती. तपासणीत त्यांचा रिपोर्ट हा पाँझिटिव्ह आला. 16 मे रोजी कुलकर्णी हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार होते.  दरम्यान आज पहाटे 5 वा. कुलकर्णी हे घराच्या बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले असता. डाँक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्याचे शाहू नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास गंगावणे यांनी सांगितले. 2 एप्रिल रोजीच कुलकर्णी यांनी फेसबुकवर "कुणी पाच कोटी दिले तर कुणी पाचशे कोटी, आम्ही आमचे आयुष्य देतोय, अशी भावनिक पोस्ट करत, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. धारावीत असलेले शाहू नगर पोलिस ठाण्याचा परिसर हा कोरोनाचा हाँटस्पाँट म्हणून ओळखला जात आहे. माञ अशा परिस्थितीत ही अत्यावशक सेवा पुरवणारे पोलिस, डाँक्टर, पालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी या ठिकाणी दिवसराञ नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. 


शुक्रवारीचं मुंबई पोलिस दलातील मधुकर माने यांचा हाय रिस्कमुळे मृत्यू झाला होता. मधुकर यांचे वय 57 असल्याने ते हाय रिस्क एज ग्रुपमध्ये मोडत होते. त्यामुळे ते मागील 15 दिवसांपासून रजेवर होते. माञ शुक्रवारी मधुकर माने यांचे निधन झाल्याचे पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून कळवले. आतापर्यंत कोरोना साथीच्या रोगाने पोलिस दलातील 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने अस्वस्थतेचे वातावरण आहे. तरी ही 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी ते तैनात आहेत. माञ मुंबई पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत दिवसेंदिवस वाढत आहे. माञ पोलिसांमध्ये कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. 


पोलिसांना विश्रांतीची गरज - उद्धव ठाकरे
 
केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे इथं भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. इथं डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना  मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचं काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल तसं केंद्र सरकारने त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा