Advertisement

चिंताजनक! अवघ्या दोन दिवसात 50 जणांचा कोरोनाने मृत्यू, मुंबईत 748 नवे रुग्ण,

मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 462 वर

चिंताजनक! अवघ्या दोन दिवसात 50 जणांचा कोरोनाने मृत्यू,  मुंबईत 748 नवे रुग्ण,
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, मुंबईत मागील 48 तासात कोरोनाचे 50 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 748 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावशक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 462 वर जाऊन पोहचला आहे.

मागील दिवसांमध्ये मुंबईत कोरोना मृत्यूदर खाली आला होता. मात्र, पुन्हा मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी  भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 रुग्ण दगावले आहेत तर 7 मे रोजी 25 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 6 मे रोजी रोजी एकूण 26 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 748 नवीन रुग्ण आढळले आहेत.

7 मे रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे काही अहवाल आले असून, त्यात 206 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून शुक्रवारी 542 नवीन रुग्णांची भर पडली आहे.  अशा रुग्णांची एकूण संख्या आता 11 हजार 967 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात  करोनाचे 154 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 2 हजार 589 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा