Advertisement

धक्कादायक! मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिक

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना बाधितांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश असल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक! मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिक
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून ती ६० हजारांच्या वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना बाधितांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाविरोधातील लढ्यातील रुग्णालय कर्मचारी, पोलिस, डॉक्टर, पालिका कर्मचारी, सफाई कामगार, बेस्टचे कामगार यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. 

मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी ३० ते ६० या वयोगटातील  ७५ टक्के रुग्ण आहेत. यातील बरेसचे रुग्ण हे अत्यावश्यक सेवेत काम करणारेच आहेत. मुंबईतील प्रत्येक प्रभागात दोन, अडीच, तीन हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. 

के पूर्व विभागात अंधेरी पूर्वमध्ये सर्वाधिक चार हजाराहून अधिक रुग्ण आहेत. यामधील ९७० रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. एफ दक्षिणमध्ये (दादर, परळ) येथील  तीन हजार रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण वैद्यकीय सेवेतील  आहेत. बोरिवलीचा भाग असलेल्या आर मध्य विभागात १५५१ रुग्ण आहेत. यातील ७०० हून अधिक रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. यामधील बहुतांशी रुग्ण महापालिकेचे कर्मचारी आहेत.

धारावीत आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्येही अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची संख्या ७५ टक्के आहे. सफाई कामगार, वॉर्डबॉय, सामान घरपोच करणारे कामगार अशा रुग्णांच्या यामध्ये समावेश आहे. नाना चौक, ग्रॅंटरोड भागातही जसलोक, भाटिया, वोकहार्ट, ब्रीच कॅण्डी अशी खासगी रुग्णालये असून त्यांचे कर्मचारी याच भागात राहणारे आहेत. त्यांच्यातही बाधितांचं प्रमाण मोठं आहे.



हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा